सामूहिक बलात्कार प्रकरणातील चार आरोपींना अटक
By Admin | Updated: June 22, 2017 01:24 IST2017-06-22T01:24:24+5:302017-06-22T01:24:24+5:30
येथील एका अल्पवयीन मुलीवर चंद्रपूर येथे सामूहिक बलात्कार केल्याच्या प्रकरणातील चार मुलांना आष्टी पोलिसांनी अटक केली.

सामूहिक बलात्कार प्रकरणातील चार आरोपींना अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टी : येथील एका अल्पवयीन मुलीवर चंद्रपूर येथे सामूहिक बलात्कार केल्याच्या प्रकरणातील चार मुलांना आष्टी पोलिसांनी अटक केली. या आरोपींना न्यायालयापुढे हजर केले असता, न्यायालयाने त्यांना २७ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपींमध्ये कुणाल बोरकुटे, मंगेश खेवले रा. बोरगाव, संतोष लिपटे रा. घुग्घुस व अविनाश पिंपकळर रा. चंद्रपूर यांचा समावेश आहे. १६ जून रोजी आष्टी येथील एक अल्पयीन मुलगी मोबाईलवर मित्राला कॉल आल्याने मित्राला भेटण्यासाठी चंद्रपूरला गेली. तिथे चार मुलांनी तिच्यावर बलात्कार केला. बेशुद्ध स्थितीत तिला चंद्रपूरच्या रुग्णालयात भरती करण्यात आले. पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला होता.