माजी उपसरपंचाची नक्षलवाद्यांकडून गोळी झाडून हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2021 23:47 IST2021-04-03T23:44:53+5:302021-04-03T23:47:02+5:30

रात्री १०.३० च्या सुमारास दोन गोळ्या झाडून हत्या

Former Deputy sarpanch shot dead by Naxals in gadchiroli | माजी उपसरपंचाची नक्षलवाद्यांकडून गोळी झाडून हत्या

माजी उपसरपंचाची नक्षलवाद्यांकडून गोळी झाडून हत्या

एटापल्ली (गडचिरोली) : एटापल्ली तालुक्यातील बुर्गी येथील माजी उपसरपंच तथा आदिवासी विद्यार्थी संघाचे कार्यकर्ते रामा तलांडी (37 वर्ष) यांची शनिवारी रात्री १०.३० वाजता नक्षल्यांनी बंदुकीतून गोळी झाडून हत्या केली. रामा तलांडी हे 10 वर्ष उपसरपंच होते

बुर्गी येथे एका लग्न समारंभात डीजे लावत असताना साध्या वेशात आलेल्या नक्षल्यांनी तलांडी यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या व जंगलात पसार झाले. यात रामा यांचा जागेवरच मृत्यू झाला. पोलीस विभागाने वृत्त लिहेपर्यंत या घटनेला दुजोरा दिला नव्हता.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही वर्षांपूर्वी बुर्गी येथे पोलीस स्टेशनच्या नवीन इमारतीचे उद्घाटन केले होते. त्यावेळी रामा तलांडे यांनी फडणवीस यांना रस्ते व मोबाईल टॉवरची मागणी केली होती.नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता.

Web Title: Former Deputy sarpanch shot dead by Naxals in gadchiroli