मेंढा येथे मोठ्या तलावाची निर्मिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 05:01 IST2020-03-03T05:00:00+5:302020-03-03T05:01:04+5:30

त्याअनुषंगाने सीआरपीएफच्या वतीने मेंढा येथे शनिवारी वर्षा जलसंचय कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी ११३ बटालियनचे कमांडंट जी.डी.पंढरीनाथ, जि.प.सदस्य विनोद लेनगुरे, सामाजिक कार्यकर्ते देवाजी तोफा, लेखामेंढाच्या सरपंच नंदा दुग्गा, कैलास सोनवने, सीआरपीएफचे द्वितीय कमान अधिकारी राजपाल सिंह, कमांडंट ए.के.अनस आदी मान्यवर उपस्थित होते.

The formation of a large pond at sheep | मेंढा येथे मोठ्या तलावाची निर्मिती

मेंढा येथे मोठ्या तलावाची निर्मिती

ठळक मुद्देमार्गदर्शन : सीआरपीएफच्या ११३ बटालियनचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्क
रांगी : सीआरपीएफच्या ११३ बटालियनच्या वतीने धानोरा तालुक्यातील मेंढा येथे जुन्या लहान दोन बोड्यांचे सपाटीकरण करून एका मोठ्या तलावाची निर्मिती करण्यात आली. या तलावाचा फायदा शेतकऱ्यांसह पाळीव प्राण्यांना होणार आहे.
त्याअनुषंगाने सीआरपीएफच्या वतीने मेंढा येथे शनिवारी वर्षा जलसंचय कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी ११३ बटालियनचे कमांडंट जी.डी.पंढरीनाथ, जि.प.सदस्य विनोद लेनगुरे, सामाजिक कार्यकर्ते देवाजी तोफा, लेखामेंढाच्या सरपंच नंदा दुग्गा, कैलास सोनवने, सीआरपीएफचे द्वितीय कमान अधिकारी राजपाल सिंह, कमांडंट ए.के.अनस आदी मान्यवर उपस्थित होते.
सीआरपीएफच्या वतीने नागरिकृती कार्यक्रमाअंतर्गत मेंढा गावात तलावाची निर्मिती करून वर्षाजल संचयनाचा कार्यक्रम घेण्यात आला. गावातील नागरिकांनी पाण्याची बचत केली पाहिजे कारण दिवसेंदिवस पाणीपातळी खालावत असल्यामुळे उन्हाळ्यात मोठे संकट उद्भवू शकते, असे देवाजी तोफा यांनी सांगितले. सीआरपीएफच्या वतीने निर्माण करण्यात आलेल्या तलावाच्या पाण्याचा येथील शेतकऱ्यांनी सिंचनासाठी उपयोग करावा, अधिकाधिक शेतजमीन ओलिताखाली आणावी, असे आवाहन कमांडंट जी.डी.पंढरीनाथ यांनी यावेळी केले. यावेळी सीआरपीएफ जवान उपस्थित होते.

Web Title: The formation of a large pond at sheep

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.