जंगल कामगार चळवळ सामाजिक व आर्थिक परिवर्तनाचे माध्यम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:40 IST2021-09-21T04:40:47+5:302021-09-21T04:40:47+5:30
आदिवासी जंगल कामगार सहकारी संस्थेच्या वतीने १० टक्के समाजकल्याण अधिदान वितरण व संस्थेची सभा दलितमित्र स्व. लहूजी मडावी सभागृहात ...

जंगल कामगार चळवळ सामाजिक व आर्थिक परिवर्तनाचे माध्यम
आदिवासी जंगल कामगार सहकारी संस्थेच्या वतीने १० टक्के समाजकल्याण अधिदान वितरण व संस्थेची सभा दलितमित्र स्व. लहूजी मडावी सभागृहात पार पडली. यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा संघाचे पर्यवेक्षक देवल सुरपाम, संस्थेचे सचिव सचिन मेश्राम उपस्थित होते. यावेळी घनश्याम मडावी यांच्या हस्ते संस्थेच्या क्रियाशील सभासदांना नामांकित कंपन्यांच्या कुलरचे वितरण करण्यात आले. दरम्यान संस्थेचे सचिव सचिन मेश्राम यांनी संस्थेचा लेखा-जोखा सादर केला. संस्थेच्या माध्यमातून १० टक्के समाजकल्याण अधिदान रकमेतून आतापर्यंत शेतीसाठी बैलजोड्या, शेळ्या, टी.व्ही. संच, स्टील आलमारी, भांडी आदी वस्तूंचे वितरण करण्यात आले. तसेच प्रबोधन मेळावे व औषधोपचार शिबिराचे आयोजन केले असल्याचे मेश्राम म्हणाले. उपस्थितांचे आभार लिपिक गुरूदेव नैताम यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मधुकर कन्नाके व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
200921\20gad_1_20092021_30.jpg
सभासदांना कूलरचे वितरण करताना संस्थाध्यक्ष घनश्याम मडावी.