वन कर्मचाऱ्यांच्या दिमतीस ४३ दुचाकी वाहने

By Admin | Updated: May 10, 2014 02:32 IST2014-05-10T00:46:15+5:302014-05-10T02:32:42+5:30

सागवान तस्करी रोखण्यासाठी वनविभागाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहे. वनकर्मचाऱ्यांना गस्तीसाठी वनविभागाने ४३ दुचाकी वाहने खरेदी केली

Forest workers hire 43 bikes | वन कर्मचाऱ्यांच्या दिमतीस ४३ दुचाकी वाहने

वन कर्मचाऱ्यांच्या दिमतीस ४३ दुचाकी वाहने

गडचिरोली : सागवान तस्करी रोखण्यासाठी वनविभागाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहे. वनकर्मचार्‍यांना गस्तीसाठी वनविभागाने ४३ दुचाकी वाहने खरेदी केली असून ही दुचाकी वाहने लवकरच वनकर्मचार्‍यांच्या सुपूर्द करण्यात येणार आहे. गेल्या महिन्यात वनकर्मचार्‍यांना सॅटेलाईट फोन उपलब्ध करून देण्यात आले. सॅटेलाईट फोन व दुचाकीच्या सहाय्याने वनकर्मचार्‍यांनी अधिकाधिक गस्ती घालून सागवान तसेच वनतस्करीला आळा घालण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. वनतस्करी होत असल्याचे माहित झाल्यानंतर दुचाकी पथक तत्काळ त्या ठिकाणी पोहोचणार आहे. त्यामुळे वनतस्करांचे धाबे दणाणले आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Forest workers hire 43 bikes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.