किष्टापूरच्या जंगलात अवैेध कोंबडबाजाराची धूम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 23:18 IST2017-08-23T23:17:56+5:302017-08-23T23:18:24+5:30
अवैैधरित्या कोंबड्याच्या झुंजी लावून त्यावर लाखो रूपयांचा सट्टा लावण्यास कायद्याने बंदी आहे.

किष्टापूरच्या जंगलात अवैेध कोंबडबाजाराची धूम
लोकमत न्यूज नेटवर्क
आलापल्ली : अवैैधरित्या कोंबड्याच्या झुंजी लावून त्यावर लाखो रूपयांचा सट्टा लावण्यास कायद्याने बंदी आहे. मात्र अहेरी तालुक्याच्या हद्दीत आलापल्ली परिसरातील किष्टापूर येथे गेल्या काही दिवसांपासून खुलेआम कोंबडबाजार सुरू आहे. विशेष म्हणजे या कोंबडबाजारात कोंबड्याच्या झुंजीवर लाखो रूपयांचा सट्टा लावल्या जात आहे. येथे दूरवरून कोंबड शौकीन दुचाकी वाहनाने दाखल होऊन आपली हौस भागवित आहेत.
आदिवासी समाजात कोंबड्याच्या झुंजी लावण्याची पारंपरिक प्रथा मानली जाते. मात्र काळानुरूप या प्रथेमध्ये बराच बदल झाला आहे. कोंबडबाजाराच्या नावावर लाखो रूपयांचा सट्टा येथे खेळल्या जात असून यामध्ये नागरिकांसह अल्पवयीन मुलेही गुंतल्या आहेत. त्यामुळे या अल्पवयीन मुलांच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
अहेरी तालुक्यात वेलगूर-किष्टापूर येथे मागील एक महिन्यापासून अवैधरित्या कोंबडबाजार सुरू आहे. येथे अहेरी, एटापल्ली, मुलचेरा तालुक्यासह तेलंगणा राज्यातील जुगार शौकीनांची गर्दी होत आहे. हजारोच्या संख्येने कोंबडबाजार शौैकीन येथे दाखल होत असतात. मुलचेरा मार्गावरील वन विभागाच्या जंगलात हा कोंबडबाजार भरविला जात असून रस्त्यावरच दुचाकी वाहनांची रांग लागलेली असते. सदर मार्गावर नेहमी वाहनांची रहदारी असल्याने ये-जा करणाºया लोकांचे लक्ष थेट या बाजाराकडे वळत असते. पोलीस प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन या कोंबडबाजारावर धाड टाकून कारवाई करावी, अशी मागणी सुज्ञ नागरिकांनी केली आहे. अशा प्रकारे कोंबडबाजार गडचिरोली जिल्ह्याच्या अनेक ठिकाणी खुलेआम भरविला जात आहे.
तीन दिवसात लाखोंचा गल्ला
पोळा सणानिमित्त वेलगूर-किष्टापूर येथे २० आॅगस्टपासून सतत चार दिवस कोंबडबाजार सुरू असल्याने सदर व्यवसाय चालविणाºयांकडे लाखो रूपयांचा गल्ला जमा झाल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. कोंबड्याच्या एका जोडीची झुंज लावण्यासाठी कोंबडबाजार मालक १०० रूपये उकडत असल्याची चर्चा आहे. तसेच कोंबड्याला काती बांधणारा १०० रूपये घेत असल्याचे सांगण्यात येत आहे. नेहमीपेक्षा यावर्षी कोंबडबाजारातील हे दर वाढले असल्याचे कोंबडा शौकीनांकडून बोेलले जात आहे.
परिसरात दारूचा महापूर
मागील एक महिन्यापासून कोंबडबाजार सुरू असल्याने वेलगूर-किष्टापुरात देशी, विदेशी दारू सर्रासपणे विकली जात आहे. एवढेच नाही तर कोंबडबाजाराच्या परिसरात विदेशी दारूच्या रिकाम्या बाटला अस्ताव्यस्त पडून असल्याचे दिसून येत आहे. शाळकरी विद्यार्थ्यांवर याचा विपरित परिणाम होत असल्याने सदर कोंबडाबाजार बंद करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.