वनविभागाचा डेपो आगीच्या भक्ष्यस्थानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2020 05:00 AM2020-05-21T05:00:00+5:302020-05-21T05:00:41+5:30

आलापल्ली-एटापल्ली मुख्य मार्गावरील आलापल्लीपासून केवळ एक किमी अंतरावर असलेल्या जवळपास सहा हेक्टर क्षेत्रात पसरलेल्या वन विभागाच्या जळाऊ लाकडाच्या डेपोला आग लागली. या घटनेची माहिती कळताच वनाधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र जोरदार वारा असल्याने व सागवानी बिट पूर्णत: सुकले असल्याने आग आटोक्यात येणे अशक्य होते.

Forest department depot on fire | वनविभागाचा डेपो आगीच्या भक्ष्यस्थानी

वनविभागाचा डेपो आगीच्या भक्ष्यस्थानी

Next
ठळक मुद्देलाखो रुपयांचे नुकसान : ५०० पेक्षा अधिक बिट जळून खाक

लोकमत न्यूज नेटवर्क
आलापल्ली : आलापल्ली वनविभागाअंतर्गत याच वनपरिक्षेत्रातील आलापल्ली येथील खसरा आगाराला भीषण आग लागल्याने या आगीत ५०० पेक्षा अधिक जळाऊ बिट खाक झाल्याची घटना सायंकाळी ४.३० ते ५ वाजताच्या सुमारास घडली.
आलापल्ली-एटापल्ली मुख्य मार्गावरील आलापल्लीपासून केवळ एक किमी अंतरावर असलेल्या जवळपास सहा हेक्टर क्षेत्रात पसरलेल्या वन विभागाच्या जळाऊ लाकडाच्या डेपोला आग लागली. या घटनेची माहिती कळताच वनाधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र जोरदार वारा असल्याने व सागवानी बिट पूर्णत: सुकले असल्याने आग आटोक्यात येणे अशक्य होते. त्यानंतर वनविभागाने स्वत:कडील पाणी टँकर व अहेरी नगर परिषदेचे अग्निशमन वाहन बोलावून आग विझविण्याचा प्रयत्न केला. दोन जेसीबी लावून लगतचे सागवानी बिट आगीपासून दूर करण्यासाठी उशिरापर्यंत प्रयत्न सुरू होते.
घटनास्थळी उपवनसंरक्षक चंद्रकांत तांबे, उपविभागीय वनाधिकारी नितेश देवगडे, वनपरिक्षेत्राधिकारी गणेश लांडगे यांच्यासह कर्मचारी आग विझविण्याच्या कामात व्यस्त होते. या डेपोमधील वनोपजाचा तपशील दर्शक बोर्ड कोरा असल्याने नेमके आकडे मिळू शकले नाही.

आग लागली कशी?
आग लागण्याचे नेमके कारण कळू शकले नाही. ही आग कशी लागली याचा शोध वनविभाग व पोलीस घेत आहेत. बरेच युवक आईवडिलांपासून लपून-छपून सिगारेट ओढण्यासाठी व गांजा पिण्यासाठी सदर वनडेपोतील बिटाच्या आड बसून राहात असल्याचे दिसून येत आहेत. कुणीतरी जळती सिगारेट कचऱ्यात फेकली असेल तर त्यापासूनही आग लागण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी चर्चा सुरू आहे. रात्री बराच वेळपर्यंत आग आटोक्यात आली नव्हती.

Web Title: Forest department depot on fire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.