कुपोषणाचा विळखा कायमच
By Admin | Updated: April 12, 2015 02:09 IST2015-04-12T02:09:06+5:302015-04-12T02:09:06+5:30
एकात्मिक बाल विकास सेवा योजना जिल्हा कक्षामार्फत कुपोषणाच्या समस्येवर अंगणवाडी केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र व इतर आरोग्य

कुपोषणाचा विळखा कायमच
गडचिरोली : एकात्मिक बाल विकास सेवा योजना जिल्हा कक्षामार्फत कुपोषणाच्या समस्येवर अंगणवाडी केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र व इतर आरोग्य यंत्रणेच्या वतीने उपाययोजना केल्या जातात. मात्र जिल्ह्याच्या दुर्गम व अतिदुर्गम भागात कुपोषण मुक्तीच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याने गडचिरोली जिल्ह्याला अद्यापही कुपोषणाचा विळखा कायम असल्याचे दिसून येते.
जिल्ह्यात अति तीव्र कुपोषित असलेल्या बालकांची टक्केवारी ४.१६ आहे. तर १६.६४ टक्के बालके साधारण कुपोषित आहेत. जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात कुपोषीत मुलांची संख्या आहे. भामरागड बाल विकास सेवा प्रकल्पात शून्य ते सहा वयोगटातील बालकांची एकूण संख्या चार हजार २१९ आहे. यापैकी साधारण कुपोषित बालकांची संख्या ९४२ असून याची टक्केवारी २२.३३ आहे. अहेरी तालुक्यात १० हजार १९५ बालकांपैकी १ हजार १४७ बालके साधारण कुपोषीत असून याची टक्केवारी ११.२५ आहे. (प्रतिनिधी)