शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
2
प्रियांका गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, सूत्रांची माहिती 
3
इकडे आड, तिकडे विहीर! युद्ध रोखले तर नेतन्याहूंचे सरकार पडणार, नाही रोखले तर...
4
हाहाकार! जम्मू-काश्मीरमध्ये पावसाचा प्रकोप, पुंछमध्ये भूस्खलन; अनेक घरं कोसळली, शाळा बंद
5
 ‘अमित शाह माझं पार्थिव उचलण्यास आले, तर खूप बरं होईल…’ दिग्विजय सिंह यांचं विधान चर्चेत  
6
पतंजलीला मोठा झटका, दृष्टी आय ड्रॉपसह 14 प्रोडक्ट्सवर बंदी, जाणून घ्या कारण
7
शिंदेंच्या शिवसेनेचे तीन उमेदवार जाहीर होणार, रवींद्र वायकरांसह ही चार नावं चर्चेत
8
Kalpana Soren Net Worth : कल्पना सोरेन आहेत करोडपती; पतीपेक्षा चारपट जास्त संपत्ती, जाणून घ्या...
9
'पीके'मध्ये आमिर खाननं खरोखर दिले होते न्यूड सीन, अभिनेता म्हणाला - "जे गार्ड घातलं होतं ते पण..."
10
गोवंडीत महायुतीचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक; अज्ञातांवर गुन्हा
11
धक्कादायक! कोरोनावरील या लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट्स, कंपनीने स्वत:च दिली कबुली    
12
कार्यकर्तेच ठरविणार विजयाचा गुलाल...! शाहू छत्रपती आणि मंडलिक लढतीकडे महाराष्ट्राचे लक्ष
13
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
14
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
15
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
16
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
17
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
18
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
19
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
20
१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती

गरीब व्यक्ती योजनांचा केंद्रबिंदू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 12:30 AM

गरीब व्यक्तीला केंद्रस्थानी मानून केंद्र व राज्य शासन योजना तयार करीत आहे. प्रशासनाने या योजनांची निट अंमलबजावणी करावी. तसेच योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनीही पुढाकार घ्यावा, असे आवाहन आमदार कृष्णा गजबे यांनी केले.

ठळक मुद्देआमदारांचे प्रतिपादन : पोलीस स्टेशनच्या वतीने पोटगाव येथे जनजागरण मेळावा

लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : गरीब व्यक्तीला केंद्रस्थानी मानून केंद्र व राज्य शासन योजना तयार करीत आहे. प्रशासनाने या योजनांची निट अंमलबजावणी करावी. तसेच योजनांचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनीही पुढाकार घ्यावा, असे आवाहन आमदार कृष्णा गजबे यांनी केले.देसाईगंज पोलीस स्टेशनच्या वतीने तालुक्यातील पोटगाव येथे जनजागरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यादरम्यान मार्गदर्शन करताना ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी शैलेश काळे, पोलीस निरिक्षक एस. डी. मांडवकर, पोलीस उपनिरिक्षक सुरज गोरे, फुलेकर, सरपंच विनायक धारगावे, उपसरपंच रूपाली गावतुरे, मुख्याध्यापक हरडे, पोलीस पाटील बासरीधर दोनाडकर, तंटामुक्त समिती अध्यक्ष मोरेश्वर गजपुरे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, आरोग्य विभाग, कृषी विभाग, बांधकाम विभागाचे कर्मचारी व अधिकारी उपस्थित होते.ग्रामीण भागातील सर्वसामान्य व गरीब नागरिकांना योजनांची माहिती देण्याच्या उद्देशाने जनजागरण मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. पावसाळ्याचे दिवस असतानाही स्थानिक नागरिकांनी तसेच सभोवतालच्या नागरिकांनी मेळाव्याला मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शविली होती.पुढे मार्गदर्शन करताना आमदार कृष्णा गजबे यांनी राज्य शासन सत्तेत आल्यापासून अनेक नाविन्यपूर्ण व महत्त्वाच्या योजना सुरू केल्या आहेत. शासनाच्या एकूण खर्चापैकी जास्तीत जास्त खर्च गरीबांच्या योजनांवर खर्च होईल, यासाठी शासन प्रयत्नरत आहे. आरमोरी विधानसभा क्षेत्रातील समस्या सोडविण्यासाठी आपण शासनाकडे पाठपुरावा केला आहे. त्याला यश मिळून काही समस्या सुटल्या सुध्दा आहे, असे मार्गदर्शन केले. यशस्वीतेसाठी पोलीस व गावकऱ्यांनी सहकार्य केले.

टॅग्स :government schemeसरकारी योजना