शैक्षणिक गुणवत्तेवर भर द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 11:05 PM2019-05-20T23:05:03+5:302019-05-20T23:05:32+5:30

आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्याकरिता शिक्षकांसह प्रत्येक कर्मचाऱ्याने प्रयत्नशील असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढ, त्यांची आरोग्यविषयक सुरक्षितता यासह त्यांच्या अनेक समस्या सोडवून व्यक्तिमत्त्व विकासावर भर द्यावा, असे प्रतिपादन सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांनी केले.

Focus on academic quality | शैक्षणिक गुणवत्तेवर भर द्या

शैक्षणिक गुणवत्तेवर भर द्या

Next
ठळक मुद्देइंदूराणी जाखड : इंग्रजी माध्यम आश्रमशाळेत तीन प्रकल्पातील कर्मचाऱ्यांची कार्यशाळा

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्याकरिता शिक्षकांसह प्रत्येक कर्मचाऱ्याने प्रयत्नशील असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढ, त्यांची आरोग्यविषयक सुरक्षितता यासह त्यांच्या अनेक समस्या सोडवून व्यक्तिमत्त्व विकासावर भर द्यावा, असे प्रतिपादन सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांनी केले.
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली, अहेरी, भामरागड अंतर्गत कार्यरत शासकीय आश्रमशाळेतील मुख्याध्यापक, अधीक्षक, अधिक्षिका यांची प्रगती कार्यशाळा सोमवारपासून स्थानिक इंग्रजी माध्यम आश्रमशाळेत सुरू झाली. ही कार्यशाळा २२ मे पर्यंत राहणार आहे. या कार्यशाळेचे उद्घाटन प्रकल्प अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांच्या हस्ते झाले. यावेळी सहायक प्रकल्प अधिकारी (प्रशासन) विकास राचेलवार, सहायक प्रकल्प अधिकारी प्रभू सादमवार, अनिल सोमनकर, वंदना महल्ले उपस्थित होते. तीन दिवसीय प्रगती कार्यशाळेत पहिल्या दिवशी गटनिहाय चर्चा, आराखडा तयार करणे, सादरीकरण, धोकादायक बाबी, सभा समिती अंतर्गत आरोग्य विषयक बाबींवर चर्चा, आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांना सर्पदंश होऊ नये म्हणून करावयाच्या उपाययोजना, सर्पदंश झाल्यास उपचाराविषयी सतर्कता तसेच इंग्रजी भाषेचा दैैनंदिन वापर, शैक्षणिक साहित्य निर्मिती याविषयी अनेक तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. प्रगती कार्यशाळेला तिन्ही प्रकल्पातील मुख्याध्यापक, अधीक्षक, अधिक्षिका उपस्थित होत्या. संचालन सहायक प्रकल्प अधिकारी अनिल सोमनकर यांनी केले. यशस्वीतेसाठी सहायक प्रकल्प अधिकारी आसाराम शिवणकर, रवी लाडे, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी डब्लू. के. कोडापे, वसंत भिवगडे यांनी सहकार्य केले.
दोन दिवस या विषयांवर होणार मार्गदर्शन
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत चालविल्या जाणाऱ्या आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढ करण्यासाठी मुख्याध्यापक, अधीक्षक, अधिक्षिकांना प्रगती कार्यशाळेच्या माध्यमातून मार्गदर्शन केले जात आहे. २१ व २२ मे रोजी योग व प्राणायाम पीओसीएसओ कायदा आणि लैैंगिक शोषण इम्प्रुव्हींग लर्निंग आऊटकम्स, शैक्षणिक गुणवत्ता विकास, मुख्याध्यापक, अधीक्षक, अधिक्षिका यांच्या जबाबदाºया, ग्रंथालयाचे विद्यार्थी जीवनातील महत्त्व, नावीण्यपूर्ण शाळा व सहशालेय उपक्रम याविषयी तर शेवटच्या दिवशी स्काऊट-गाईड, शालेय शीस्त, श्रमदान, अ‍ॅक्टिव्हीटी बेस लर्निंग अँड डिजिटल स्कूल, निर्लेखन, व्यक्तिमत्त्व विकास व प्रोत्साहन या प्रमुख विषयांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे.

Web Title: Focus on academic quality

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.