देसाईगंज तालुक्यातील फरी परिसरात फुलल्या भाजीपाल्याच्या बागा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 01:21 IST2017-08-30T01:20:56+5:302017-08-30T01:21:11+5:30
पारंपरिक धानपिकाला फाटा देत देसाईगंज तालुक्यातील फरी गावातील शेतकºयांनी भाजीपाल्याचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे.

देसाईगंज तालुक्यातील फरी परिसरात फुलल्या भाजीपाल्याच्या बागा
अरविंद घुटके।
लोकमत न्यूज नेटवर्क
मोहटोला/किन्हाळा : पारंपरिक धानपिकाला फाटा देत देसाईगंज तालुक्यातील फरी गावातील शेतकºयांनी भाजीपाल्याचे उत्पादन घेण्यास सुरुवात केली आहे. गावाच्या सभोवताल आता धानाच्या शेतीऐवजी भाजीपाल्याचा बागा दिसायला सुरुवात झाली आहे. फरी येथील शेतकºयांनी निवडलेली ही नवीन वाट इतर शेतकºयांसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे.
देसाईगंज तालुक्यासह जिल्हाभरात प्रामुख्याने धानपिकाचे उत्पादन घेतले जाते. मात्र दिवसेंदिवस धानाची शेती आतबट्ट्याचा उद्योग ठरत चालला आहे. मात्र जोखीम उठविण्याची तयारी शेतकºयांमध्ये नसल्याने अनेक शेतकरी अजूनही धानपिकाचीच शेती करीत आहेत. मात्र फरी-झरी गावातील नागरिकांनी धानाच्या शेतीला रामराम ठोकत भाजीपाल्याच्या शेतीकडे वळले आहेत. विशेष म्हणजे फरी-झरी परिसरात यापूर्वी हिवाळा व उन्हाळ्यातच भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जात होते. मात्र आता पावसाळ्यातही भाजीपाल्याची लागवड केली जात आहे. फरी-झरी गावाबरोबरच अरततोंडी, मोहटोला, किन्हाळा गावातीलही शेतकरी भाजीपाला लागवडीकडे वळला आहे. फरी-झरी गावात १५ ते २० शेतकºयांनी भाजीपाल्याची लागवड केली आहे. दिनेश मोहुर्ले या शेतकºयाने दोन एकरात भाजीपाल्याची बाग फुलविली आहे. वांगी, कारले, लवकी, दोडका, मिरची, काकडी, टमाटर, चवळीच्या शेंगा आदी पिकांची लागवड केली आहे. दोन एकरातून किमान दोन लाख रूपयांचे उत्पादन होईल, अशी माहिती त्यांनी लोकमतशी बोेलताना दिली आहे. बंगाली समाजाचे शेतकरी यापूर्वी भाजीपाल्याची लागवड करीत होते. त्यांच्यापासून प्रेरणा घेत इतरही शेतकºयांनी भाजीपाला लागवडीला सुरुवात केली आहे. दिवसेंदिवस भाजीपाल्याचे क्षेत्र वाढत चालले आहे. शेती हा तोट्याचा व्यवसाय असल्याची बोंब होत असतानाच या गावातील शेतकºयांनी मात्र शेतीतून अधिकचे उत्पन्न मिळविण्यास सुरुवात केली आहे. इतर शेतकºयांसाठी सदर शेतकरी प्रेरणादायी ठरत आहेत.
यंदा स्थानिक भाजीपाला
देसाईगंजच्या आठवडी बाजारात यापूर्वी पावसाळ्यादरम्यान प्रामुख्याने नागपूर जिल्ह्यातील भाजीपाला येत होता. आता मात्र देसाईगंजच्या बाजारपेठेत तालुक्यातीलच भाजीपाला बघायला मिळतो. व्यापाºयांच्या तुलनेत शेतकºयाकडील भाजीपाला स्वस्तदरात मिळत असल्याने शेतकºयांकडील भाजीपाला घेण्यास अधिक पसंती दर्शवित आहेत.
नगदी पिकांची लागवड करण्यासाठी शेतकºयांना प्रोत्साहित करावे, यासाठी शासनाच्या अनेक योजना आहेत. मात्र देसाईगंज तालुक्यातील शेतकरी स्वत:हून भाजीपाल्याची लागवड करीत असताना कृषी विभागाचे त्यांना मार्गदर्शन लाभत नसल्याचे दिसून येत आहे.