पाच वर्षात ४६ कोटीतून रस्ते, इतर बांधकामांवर खर्च
By Admin | Updated: November 19, 2014 22:40 IST2014-11-19T22:40:35+5:302014-11-19T22:40:35+5:30
प्रत्येक गावाला रस्त्यांनी जोडण्याचा प्रयत्न करतांना गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील रस्त्यांचा विकास साधण्यात आला. या विधानसभा क्षेत्रातील गडचिरोली, चामोर्शी, धानोरा व मुलचेरा तालुक्यातील

पाच वर्षात ४६ कोटीतून रस्ते, इतर बांधकामांवर खर्च
गडचिरोली : प्रत्येक गावाला रस्त्यांनी जोडण्याचा प्रयत्न करतांना गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील रस्त्यांचा विकास साधण्यात आला. या विधानसभा क्षेत्रातील गडचिरोली, चामोर्शी, धानोरा व मुलचेरा तालुक्यातील काही भागात मोठ्या प्रमाणावर रस्त्यांचा विकास करण्यात आला. मागील पाच वर्षात गडचिरोली विधानसभा क्षेत्रात रस्त्यासह इतर बांधकामावर ४६ कोटी ३४ लाख ३२ हजार ५१० रूपयांचा खर्च करण्यात आला.
२०११-१२ मध्ये गडचिरोली व चामोर्शी तालुक्यात रस्ता, रस्त्यावर स्लॅब ड्रेनचे बांधकाम करणे, खडीकरण, पांदन रस्ता आदी १४ कामे करण्यात आली. यावर १ कोटी ९३ लाख २४ हजार रूपयांचा खर्च करण्यात आला. त्याबरोबरच एकात्मिक कृती आराखडा अंतर्गत चामोर्शी तालुक्यात ९ विकास कामांवर ६ कोटी ८२ लाख ८ हजार ५१० रूपयांचा निधी खर्च करण्यात आला. यामध्ये मुरमुरी, अनंतपूर, हिवरगाव, कुदुरर्शी टोला, रेखेगाव, घोट, देवापूर आदी गावांमध्ये रस्त्याचे खडीकरण व सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात आले. गडचिरोली तालुक्यात प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत १२ विकास कामे करण्यात आली. या कामांवर १८ कोटी १५ लाख ३१ हजार रूपयांचा खर्च करण्यात आला. माडेमुल, इंदाळा, पारडी, गोगाव, नवरगाव, रानभूमी, मरेगाव, माडेतुकूम, दर्शनी चक, येवली, विश्रामपूर- उसेगाव, मौशीखांब, गिलगाव, आंबेशिवणी आदी गावांना रस्त्याने जोडून डांबरीकरण करण्यात आले. धानोरा तालुक्यात ६ कामांवर ८९ लाखांचा खर्च करण्यात आला. यात कुथेगाव- फुलबोडी, येरकड- गटानयेली, दराची- माळंदा, येरंडी, दुधमाळा, उशिरपार - कारवाफा रस्त्यांची दुरूस्ती करण्यात आली.
२०१२-१३ अंतर्गत गडचिरोली विधानसभा क्षेत्रात ३९ विकासकामे करण्यात आली. यामध्ये रस्त्याचे बांधकाम, दुरूस्ती, मोरी बांधकामांचा समावेश आहे. या कामांवर एकुण ५ कोटी ६० लाख ५३ हजार रूपयांचा खर्च करण्यात आला. या निधी अंतर्गत धानोरा, गडचिरोली, चामोर्शी व मुलचेरा तालुक्यातील काही भागांमध्ये रस्त्यांचे बांधकाम करण्यात आले.
त्याबरोबरच रस्त्याचे खडीकरण, रस्त्यावर मोरी बांधकाम, दुरूस्ती, रस्त्यांना संरक्षण भिंत उभारणे आदी १७ कामे गडचिरोली विधानसभा क्षेत्रात करण्यात आली. या बांधकामांवर २ कोटी १८ लाख रूपयांचा निधी खर्च करून पेंढरी- रेचेगाव, चव्हेला- पेंढरी, मुरूमगाव- जप्पी, चिचोली- सालेभट्टी, चातगाव- टोला, मौशिखांब- मोहटोला, कातखेडा- मौशिचक, मुरमाडी, कुरखेडा- खुर्सा, नवेगाव- खुर्सा, सावरगाव- कुरखेडा आदी मार्गावरील रस्त्यांची दुरूस्ती, खडीकरण व डांबरीकरणाची डागडूजी करण्यात आली. या अंतर्गत १७ कामे करण्यात आली. (शहर प्रतिनिधी)