शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

‘करकर’ कापणी ऐकली पाच गावांनी, ना पडली ‘त्या’ रक्षकांच्या कानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2022 05:00 IST

आरमोरी वनपरिक्षेत्राच्या विहीरगावातील एका शेतकऱ्याच्या खसऱ्यावरील ६० सागवान झाडे परवानगीसह तोडली. अधिकाऱ्यांनी शेतात जाऊन लाकडावर हॅमर मारला. आता लाकडे नेण्याची वेळ हाेती. तर काय मग जवळपास आठ दिवस दुसऱ्या दोन शेतकऱ्यांच्या शेतातील ९० सागवान झाडे अवैधरित्या ताेडली; परंतु ही झाडे ताेडताना करवताचा ‘करकर’ आवाज परिसराच्या पाच गावात दणाणला.

भीमराव मेश्राम लाेकमत न्यूज नेटवर्कजोगीसाखरा : ‘वरातीमागून घाेडे नाचविणे’ ही म्हण वनविभागाच्या बाबतीतही खरी ठरते. सर्व नष्ट झाल्यानंतर कारवाईचे साेंग वन खात्यातील काही अधिकारी व बहुतांश कर्मचारी करतात. मग ते जंगलावरील अतिक्रमण असाे की, अवैध वृक्षताेड. अवैध वृक्षताेडीसंदर्भात आरमाेरी तालुक्याच्या विहीरगावात असाच प्रकार घडला. मशीनद्वारे अवैधरित्या ९० सागवान वृक्षांची ताेड केली. आठ दिवस पाच गावातील लाेकांनी करवताची ‘करकर’ ऐकली; पण जंगलाचे रक्षण करणाऱ्यांच्या कानी का नाही पडली, असा प्रश्न निर्माण हाेत आहे. आरमोरी वनपरिक्षेत्राच्या विहीरगावातील एका शेतकऱ्याच्या खसऱ्यावरील ६० सागवान झाडे परवानगीसह तोडली. अधिकाऱ्यांनी शेतात जाऊन लाकडावर हॅमर मारला. आता लाकडे नेण्याची वेळ हाेती. तर काय मग जवळपास आठ दिवस दुसऱ्या दोन शेतकऱ्यांच्या शेतातील ९० सागवान झाडे अवैधरित्या ताेडली; परंतु ही झाडे ताेडताना करवताचा ‘करकर’ आवाज परिसराच्या पाच गावात दणाणला. मग अशावेळी वन विभागातील चौकीदारसह संबंधित वनरक्षक, वनपाल आणि वनाधिकारी यांना या प्रकरणाची भनक लागू नये, याच बाबीने लाेक जीभ चावतात. संबंधित वन कर्मचारी सुट्टीवर होते की, कंत्राटदाराशी हितसंबंध जाेपासून होते. गावांमध्ये बीट गार्ड असताना नागरिकांकडून वनाधिकाऱ्यांना तक्रार येण्याची गरज का भासावी. एका खसऱ्याच्या परवानगीमागे कंत्राटदार व अधिकाऱ्यांच्या संगनमताने अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील तर बहुतेक वेळा जंगलातील झाडे तोडून अधिकृत मालात मिसळून माल सर्रास साॅ-मिलमध्ये विकला जाताे.

मंजुरीसाठी किती कालावधी? खसऱ्यावरील सागवान झाडे तोडण्यासाठी २० प्रकारचे कागदपत्र तयार करावे लागतात. हे कागदपत्र तयार करण्यासाठी सहा ते सात महिन्यांचा कालावधी लागतो. कधी वर्ष उलटते; पण शेतकऱ्याला स्वतः च्या सातबाऱ्यावर नमूद झाड तोडण्यासाठी परवानगी लवकर मिळत नाही;  मात्र ठेकेदारामार्फत तोडायचे असतील तर परवानगी लवकर मिळते, ही वस्तुस्थिती आहे. 

हा मार्ग तर अगदी साेपा -    शेतकऱ्याच्या शेतातील अवैध सागवानाची तोड झाली तर दंड भरून सदर माल शेतकऱ्यांना दोन महिन्यात परत दिला जातो. सात महिने कागदावर जुळवाजुळव करण्यापेक्षा हा मार्ग ठेकेदारांना अधिक सोपा जातो. -   पाचशे-हजार रुपयाला एक झाड प्रमाणे विकलेल्या शेतकऱ्यांकडे लाखो रुपये दंड भरण्यासाठी खरेच उपलब्ध होतात का? ही गंभीर बाब  आहे.

 

टॅग्स :forest departmentवनविभाग