पाच तालुके काेराेनामुक्तीच्या वाटेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2021 05:00 IST2021-06-14T05:00:00+5:302021-06-14T05:00:23+5:30
काेराेनाच्या दुसऱ्या लाटेने जिल्ह्यात चांगलाच कहर केला. सक्रिय रुग्णांची संख्या पाच हजारांपर्यंत पाेहाेचली हाेती. तसेच दुसऱ्या लाटेत ५०० पेक्षा अधिक नागरिकांचा बळी गेला. त्यामुळे ही लाट कधी ओसरेल याची प्रतीक्षा नागरिक करीत हाेते. राज्य शासनाने उपाययाेजना म्हणून राज्यभरात लाॅकडाऊन जाहीर केले. तसेच प्रवासावरही बंधणे घालण्यात आली हाेती. जिल्ह्याच्या सीमाही बंद करण्यात आल्या हाेत्या. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला.

पाच तालुके काेराेनामुक्तीच्या वाटेवर
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : आरमाेरी, धानाेरा, एटापल्ली, कुरखेडा, काेरची या पाच तालुक्यांमध्ये १५ पेक्षा कमी रुग्ण उपचार घेत आहेत. हे तालुके लवकरच काेराेनामुक्त हाेण्याची शक्यता आहे.
काेराेनाच्या दुसऱ्या लाटेने जिल्ह्यात चांगलाच कहर केला. सक्रिय रुग्णांची संख्या पाच हजारांपर्यंत पाेहाेचली हाेती. तसेच दुसऱ्या लाटेत ५०० पेक्षा अधिक नागरिकांचा बळी गेला. त्यामुळे ही लाट कधी ओसरेल याची प्रतीक्षा नागरिक करीत हाेते. राज्य शासनाने उपाययाेजना म्हणून राज्यभरात लाॅकडाऊन जाहीर केले. तसेच प्रवासावरही बंधणे घालण्यात आली हाेती. जिल्ह्याच्या सीमाही बंद करण्यात आल्या हाेत्या. त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला. बाधित रुग्णांची संख्या ओसरायला लागली. जिल्ह्यात आता केवळ ३६१ रुग्ण उपचार घेत आहेत. त्यातही सर्वाधिक १०६ रुग्ण गडचिराेली तालुक्यातील आहेत. त्यानंतर चामाेर्शी तालुक्यात ६३ रुग्ण उपचार घेत आहेत. काेरची तालुक्यात आता केवळ १ रुग्ण आहे.
कुरखेडा तालुक्यात १०, एटापल्ली १०, धानाेरा ५ व आरमाेरी तालुक्यात केवळ १३ रुग्ण उपचार घेत आहेत. बाधितांची संख्या कमी व मुक्त हाेणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने लवकरच हे तालुके काेराेनामुक्त हाेतील अशी शक्यता आहे.
लाॅकडाऊनमध्ये शिथीलता दिल्यानंतर बाजारपेठेत पुन्हा गर्दी वाढू लागली आहे. कार्यक्रमांची रेलचेल सुरू झाली आहे. त्यामुळे पुन्हा तिसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
४४ काेराेनामुक्त तर ३३ नवीन बाधित
गडचिरोली जिल्ह्यात ३३ नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच रविवारी ४४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. एकूण बाधितांची संख्या २९ हजार ९१२ एवढी झाली आहे. त्यापैकी २८ हजार ८१७ जणांनी काेराेनावर मात केली आहे. सध्या ३६१ काेराेना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण ७३४ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. आज एकाही मृत्यूची नोंद नाही.
नवीन ३३ बाधित
गडचिरोली तालुक्यातील ११, अहेरी तालुक्यातील १, चामोर्शी तालुक्यातील ५, कुरखेडा तालुक्यातील बाधितांमध्ये ५, मुलचेरा तालुक्यातील बाधितांमध्ये ६, सिरोंचा तालुक्यातील बाधितांमध्ये ४ तर देसाईगंज तालुक्यातील बाधितांमध्ये १ जणांचा समावेश आहे.