शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
6
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
7
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
8
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
9
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
10
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
11
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
12
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
13
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
14
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
17
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
18
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
19
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
20
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप

Video : 'या' नक्षलवादी भागात पहिल्यांदाच गुंजला भारतमातेचा जयघोष

By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2021 7:30 PM

Republic Day celebration first time in Naxal area : बाहेरच्या जगाशी त्यांचा संबंध फारच कमी असतो. परिणामी राष्ट्रीय सणही साजरे होत नाही. पण यावेळी त्यांनी इतर भारतीयांप्रमाणे अगदी उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा केला.

ठळक मुद्दे सर्वांचे तोंड गोड केल्याने आदिवासी बांधवांच्या चेहऱ्यावर हास्य व समाधान फुलले. सर्वांनी 'भारत माता की जय'चे नारे लावत लोकशाही व्यवस्थेबद्दल आदर व्यक्त केला.

श्यामराव येरकलवार

लाहेरी (गडचिरोली) : एकीकडे 26 जानेवारीला देशभरात प्रजासत्ताक दिनाचा उत्साह असताना गडचिरोलीच्या दुर्गम भागात मात्र राष्ट्रीय सण कोणते आणि ते कशासाठी साजरे केले जातात याचा लवलेशही नसतो. पण यावेळी अनेक भागात पोलिसांच्या पुढाकाराने नक्षलग्रस्त आणि दुर्गम भागातही प्रजासत्ताक दिन साजरा झाला. या दिवसाचे महत्व बालगोपालांसह गावकऱ्यांना सांगण्यात आले. एवढेच नाही तर त्यांचे तोंडही गोड करण्यात आले.गडचिरोली या जिल्हा मुख्यालयापासून 200 किलोमीटरपेक्षा जास्त लांब असलेल्या आदिवासीबहुल भामरागड तालुक्यातील लाहेरी, मुरंगलसारखा परिसर नेहमीच नक्षल दहशतीत वावरणारा आहे. त्यामुळे बाहेरच्या जगाशी त्यांचा संबंध फारच कमी असतो. परिणामी राष्ट्रीय सणही साजरे होत नाही. पण यावेळी त्यांनी इतर भारतीयांप्रमाणे अगदी उत्साहात प्रजासत्ताक दिन साजरा केला.

नक्षलविरोधी अभियान राबवित असलेल्या पोलीस ठाणे लाहेरीचे प्रभारी अधिकारी अविनाश नळेगावकर हे आपल्या पोलीस पथकासह मुरंगल येथे आले व त्यांनी गावकऱ्यांना या दिवसाचे महत्त्व सांगत उपस्थित गावकरी, बालकांना मिठाई वाटप केली. सर्वांचे तोंड गोड केल्याने आदिवासी बांधवांच्या चेहऱ्यावर हास्य व समाधान फुलले. सर्वांनी 'भारत माता की जय'चे नारे लावत लोकशाही व्यवस्थेबद्दल आदर व्यक्त केला.

पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, उपविभागीय पोलिस अधिकारी कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी केलेल्या या संवेदनशील उपक्रमाने आदिवासी बांधव भारावून गेले. यावेळी सीआरपीएफ 37 बटालियनचे असिस्टंट कमांडंट संतोष भोसले पीएसआय अजयकुमार राठोड, विजय सपकाळ, हवालदार अरुण टेकाम, नायक यशवंत दाणी, फिरोज गाठले, शिपाई मोहित मानकर, पुरुषोत्तम कुमरे, मालू पुंगाटी, चिरंजीव दुर्गे, सौरव बाळबुध्ये, हमीत डोंगरे, अमित कुलेटी, संदीप आत्राम व सीआरपीएफचे जवान आदी उपस्थित होते.

टॅग्स :Republic Dayप्रजासत्ताक दिनnaxaliteनक्षलवादीPoliceपोलिस