शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

पाऊण तासात येणार पहिल्या फेरीचा कौल

By admin | Updated: October 18, 2014 23:24 IST

सकाळी ८ वाजता सुरू होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या पहिल्या फेरीचा कौल अवघ्या ४५ मिनिटात येणार आहे. त्यामुळे संपूर्ण निकाल दुपारी १ वाजेपर्यंत येईल, अशी अपेक्षा आहे.

गडचिरोली : सकाळी ८ वाजता सुरू होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या पहिल्या फेरीचा कौल अवघ्या ४५ मिनिटात येणार आहे. त्यामुळे संपूर्ण निकाल दुपारी १ वाजेपर्यंत येईल, अशी अपेक्षा आहे. गडचिरोली जिल्ह्यात आरमोरी, गडचिरोली, अहेरी हे तीन विधानसभा मतदार संघ आहेत. आरमोरीची मतमोजणी देसाईगंज येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात तर गडचिरोलीची मतमोजणी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या सभागृहात होणार आहे. तसेच अहेरी विधानसभा क्षेत्राची मतमोजणी नागेपल्लीस्थित औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या सभागृहात होणार आहे. या तिनही मतमोजणीच्या ठिकाणी प्रत्येकी १४ टेबलची व्यवस्था करण्यात आली असून प्रत्येक टेबलवर दोन कर्मचारी काम करणार आहे. याशिवाय पोस्टर मतपत्रिका मोजण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था आहे. साधारण एका फेरीला एका टेबलवर १ हजार मतांची मोजणी होईल, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे प्रत्येक फेरीचा कौल हा ४५ मिनीटात येईल, असे प्रशासकीय सुत्रांचे म्हणणे आहे. आरमोरी विधानसभा क्षेत्रात १ लाख ७१ हजार ६१४ मतदारांनी मतदान केले. गडचिरोली क्षेत्रात १ लाख ६१ हजार ३७० तर अहेरी क्षेत्रात १ लाख ५० हजार ७४८ मतदान झाले आहे. त्यामुळे साधारणत: दुपारी १ वाजेपर्यंत या संपूर्ण मतांची मोजणी होऊन अंतिम निकाल जाहीर होईल. मतमोजणीच्या ठिकाणी कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. गडचिरोली पोलीस दलाच्या जवानांसह राज्य राखीव पोलीस दलाचे जवानही येथे तैनात करण्यात आले आहे. तीनही विधानसभा मतदार संघात केंद्रीय निवडणूक निरीक्षक जबाबदारी सांभाळून आहेत. उद्या मतमोजणीत तीन विधानसभा क्षेत्रातील ३६ उमेदवारांच्या भाग्याचा फैसला होणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)