शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
3
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
4
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
5
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
6
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
7
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
8
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
9
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
10
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
11
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
12
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
13
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
14
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
15
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
16
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
17
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल
18
रवींद्र वायकर यांच्या मालमत्तेत ६ कोटींनी वाढ; २०१९ मध्ये १० कोटी १९ लाखांची संपत्ती
19
या निवडणुकीतला पहिला हेलिकॉप्टर अपघात; महाड येथील दुर्घटना, पायलट किरकोळ जखमी
20
नरेश म्हस्के यांच्याकडे २६ कोटींची संपत्ती; तीन कार, ३ कोटी ६२ लाखांचे कर्ज

पहिल्याच पावसाळ्यात बंधारा गेला वाहून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2019 12:33 AM

बंधाऱ्याचे निकृष्ट बांधकाम होण्यासाठी कंत्राटदार जेवढा जबाबदार आहे, तेवढेच जलयुक्त शिवार अभियानाचे अभियंते सुध्दा जबाबदार आहेत. दुर्गम भागातील बंधारे असल्याने या भागातील नागरिक तक्रार करणार नाही, ही बाब लक्षात घेऊन अभियंत्यांनी चिरीमिरी घेऊन कंत्राटदाराला मोकळीक दिली.

ठळक मुद्देहुडूकदुम्मा येथील बंधारा । निकृष्ट दर्जाच्या बांधकामाचा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्ककोरची : तालुक्यातील बोरी ग्रामपंचायत हद्दितील हुडूकदुम्मा येथे चार महिन्यांपूर्वी सिमेंट बंधारा बांधण्यात आला होता. सदर बंधारा पहिल्याच पावसाळ्यात वाहून गेला आहे. त्यामुळे बंधाऱ्याच्या बांधकामाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.मृद व जलसंधारण विभागाच्या वतीने जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत कोरची तालुक्यात पड्यालजोग येथे तीन बंधारे, घुगवा येथे दोन, हेटाळकसात पाच, हुडूकदुम्मात दोन, खसोडाला, काडे येथे प्रत्येकी दोन असे एकूण १६ बंधारे मंजूर केले. १६ बंधारे कंत्राटदाराने स्वत: लेआऊट टाकून बांधले. त्यापैकी बोरी ग्रामपंचायत हद्दितील हुडूकदुम्मा येथे १० टीसीएम क्षमतेचा बंधारा जंगलातून येणाऱ्या नाल्यावर बांधण्यात आला. बंधारे बांधकाम सुरू असताना अभियंत्यांनी भेट देऊन कामाची पाहणी करणे आवश्यक होते. मात्र बांधकामादरम्यान अभियंत्यांनी भेटच दिली नाही. त्यामुळे कंत्राटदाराने आपल्या परीने बंधारा बांधून पैसे उचलले. पहिल्याच पावसाळ्यात बंधारा वाहून गेला आहे. बंधाऱ्याचे दोन तुकडे पडले आहेत. यावरून बंधारे काम निकृष्ट होत असल्याचे स्पष्ट होत आहे. शेतकऱ्यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध होईल, या उद्देशाने बंधारे बांधण्यात आले होते. मात्र या बंधाऱ्यामुळे शेतकऱ्यांचा फायदा होण्याऐवजी कंत्राटदार व जलयुक्त शिवार अभियानाच्या अभियंत्यांचाच फायदा झाला आहे. शासनाचे लाखो रुपये पाण्यात गेले आहेत.अभियंता व कंत्राटदारावर कारवाई कराबंधाऱ्याचे निकृष्ट बांधकाम होण्यासाठी कंत्राटदार जेवढा जबाबदार आहे, तेवढेच जलयुक्त शिवार अभियानाचे अभियंते सुध्दा जबाबदार आहेत. दुर्गम भागातील बंधारे असल्याने या भागातील नागरिक तक्रार करणार नाही, ही बाब लक्षात घेऊन अभियंत्यांनी चिरीमिरी घेऊन कंत्राटदाराला मोकळीक दिली. संपूर्ण बंधाऱ्याचे बांधकाम झाले तरी एकही अभियंता कामावर फिरकला नाही, अशी माहिती गावकऱ्यांनी लोकमतला दिली आहे. या बंधाऱ्यात फार मोठा भ्रष्टाचार झाला असून बंधाऱ्याची संपूर्ण रक्कम संबंधित कंत्राटदार व अभियंत्यांकडून वसूल करावी, अशी मागणी आहे. याबाबत उपविभागीय अभियंता बरडे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी फोन उचलला नाही. कोरची तालुक्यातील इतर १६ ठिकाणच्या बंधाºयाचेही बांधकाम निकृष्ट झाले असण्याची शक्यता आहे. या संपूर्ण बंधाऱ्यांच्या बांधकामाची चौकशी करून संबंधितावर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :Waterपाणीgram panchayatग्राम पंचायत