डोंगर पहाडावर टाकली फायरलाईन

By Admin | Updated: February 25, 2016 01:19 IST2016-02-25T01:19:38+5:302016-02-25T01:19:38+5:30

वनपरिक्षेत्र दक्षिण धानोरा अंतर्गत दुधमाळा उपक्षेत्रातील मेंढा (लेखा), काकडयेली व महावाडा या तीन गावातील तब्बल १३०० लोकांनी एकत्र येऊन..

Firewall on the mountain mountain | डोंगर पहाडावर टाकली फायरलाईन

डोंगर पहाडावर टाकली फायरलाईन

गावसीमा आखली : तीन गावातील १३०० लोकांचा पुढाकार
गडचिरोली : वनपरिक्षेत्र दक्षिण धानोरा अंतर्गत दुधमाळा उपक्षेत्रातील मेंढा (लेखा), काकडयेली व महावाडा या तीन गावातील तब्बल १३०० लोकांनी एकत्र येऊन वन विभागाचे कर्मचारी व संयुक्त वनव्यवस्थापन समितीच्या नेतृत्वात डोंगर पहाडावरील जंगल क्षेत्रात गावाची सीमा आखून फायरलाईन सोमवारी टाकली.
जंगलाला आग लागून वनसंपत्ती मोठ्या प्रमाणात नष्ट होते. तसेच वन्यप्राण्यांच्या जीवाला धोकाही निर्माण होतो. वणव्याचे यासह अनेक दुष्परिणाम दुधमाळाचे क्षेत्रसहायक जवाहरलाल गेडाम यांनी तिन्ही गावात सभा घेऊन लोकांना सांगितले.
त्यानंतर मेंढा, काकडयेली, महावाडा या तिन्ही गावातील लोकांनी एकत्र येऊन सामूहिकरीत्या श्रमदानाने गावसीमा हद्दीची तोड व स्वच्छता करून जाड रेषा आखली. जमिनीपासून १२०० मीटर उंच असलेल्या डोंगर पहाडीवर चढून जंगलाच्या संरक्षणाची सीमा आखली.
धानोरा वनपरिक्षेत्र दक्षिण कार्यालयामार्फत काकडयेली व मेंढा (लेखा) या वन संरक्षण समितीला वाईन्ड ब्लोअर मशिन देण्यात आली. या मशिनच्या सहाय्याने १३०० लोकांनी वणव्यास प्रतिबंधक जाड रेषा आखून वणव्यापासून या जंगलाचे संरक्षण करण्याचा संकल्प यावेळी केला. याप्रसंगी दक्षिण धानोराचे वनपरिक्षेत्राधिकारी इंद्रजीत विकम यांच्या मार्गदर्शनाखाली दुधमाळाचे क्षेत्रसहायक जवाहरलाल गेडाम, मेंढा (लेखा) चे वनरक्षक आर. एस. लांजेवार, महावाडाचे वनरक्षक नंदेश्वर यांच्यासह तिन्ही गावातील गावपाटील व नागरिक उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Firewall on the mountain mountain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.