झोपडपट्टीतील घरांना आग

By Admin | Updated: December 31, 2015 01:24 IST2015-12-31T01:24:47+5:302015-12-31T01:24:47+5:30

येथील दुर्गा मंदिर वॉर्डातील टिळक चौकामधील झोपडपट्टीतील कवेलू वस्तीमध्ये बुधवारच्या पहाटे ४ वाजता दुर्गा मंदिराचे पुजारी

Fire to slum dwellers | झोपडपट्टीतील घरांना आग

झोपडपट्टीतील घरांना आग

शॉर्ट सर्किट : पुजारी दुमाणेंचे संपूर्ण घर जळून खाक
आरमोरी : येथील दुर्गा मंदिर वॉर्डातील टिळक चौकामधील झोपडपट्टीतील कवेलू वस्तीमध्ये बुधवारच्या पहाटे ४ वाजता दुर्गा मंदिराचे पुजारी श्यामराव दुमाणे यांच्या घराला शॉर्ट सर्किटने आग लागली. या आगीत त्यांचे संपूर्ण घर जळून खाक झाले. यात त्यांचे दीड लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. घटनास्थळी जाऊन तलाठ्यांनी पंचनामा केला.
बुधवारी पहाटे ४ वाजता घरातील विद्युत प्रवाहात शॉर्ट सर्किट झाल्याने शामराव दुमाणे यांच्या घराला आग लागली. परिसरातील नागरिकांनी ही आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र घर दाट वस्तीत असल्याने शेजारच्या झोपड्यांनाही आग लागण्यास सुरुवात झाली. त्यानंतर तत्काळ देसाईगंज नगर पालिकेच्या अग्निशामन पथकाला सूचना करण्यात आली. ते दाखल होताच आग विझविण्यात आली. मात्र या आगीमध्ये शामराव दुमाणे यांचे घर पूर्णत: जळून खाक झाले. घरातील कपडे, पैसे, धान्य, दागिणे पूर्णत: जळाले.
पत्नी व मुलगी बाहेरगावी गेले असल्याने दुमाणे एकटेच घरी होते. दुमाणे दररोज पहाटे दुर्गा मंदिर उघडून पूजा- अर्चा करीत ते मंदिरात असतानाच आग लागली असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यांचे दीड लाख रूपयांचे नुकसान झाले असून या घटनेचा पोलीस व महसूल प्रशासनाने पंचनामा केला. तलाठी कोकोडे यांनीही घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. (प्रतिनिधी)

Web Title: Fire to slum dwellers