चामोर्शी शहरातील तीन दुकानदारांकडून ७५०० रुपयांचा दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:37 IST2021-04-24T04:37:27+5:302021-04-24T04:37:27+5:30
चामोर्शी : कोरोनाने घातलेल्या धुमाकुळाला आवर घालण्यासाठी राज्य सरकारने आखलेल्या नियमावलीनुसार जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंध व संचारबंदी लागू केली. ...

चामोर्शी शहरातील तीन दुकानदारांकडून ७५०० रुपयांचा दंड वसूल
चामोर्शी : कोरोनाने घातलेल्या धुमाकुळाला आवर घालण्यासाठी राज्य सरकारने आखलेल्या नियमावलीनुसार जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंध व संचारबंदी लागू केली. पण, त्याला न जुमानता निर्बंधांचे उल्लंघन करणाऱ्यांवर नगर पंचायत आणि पोलीस प्रशासनाकडून धडक कारवाई सुरू करण्यात आली. शुक्रवारी ३ दुकानदारांना दंड ठोठावण्यात आला.
शहरातील अत्यावश्यक दुकाने ११ वाजेपर्यंतच सुरू ठेवण्याचे निर्देश असताना तीन दुकानदारांनी निर्बंधांचे उल्लंघन केल्याचे पथकाच्या लक्षात आले. त्यांनी तीनही दुकानदारांना मिळून ७५०० रुपयांचा दंड ठोठावला. जिल्हा प्रशासनाने घालून दिलेल्या नव्या नियमावलीनुसार चामोर्शी शहरातील किराणा, दूध, फळे, अंडी, मांस विक्री, दैनंदिन गरजेची दुकाने सकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे निर्देश आहेत. शहरातील हार्डवेअर, ट्रॅक्टर व डेली निड्स अशी तीन दुकाने ११ वाजेनंतरही चालू असल्याची माहिती मिळताच पथकांनी त्या ठिकाणी धडक देऊन कारवाई केली.
ही कारवाई न.पं.चे अभियंता निखिल कारेकर, अधीक्षक मोरेश्वर पेंदाम, लेखापाल जगदीश नक्षिने, वसुली लिपिक विजय पेडीवार, कर निरीक्षक भारत वासेकर, हाफिज सय्यद, रमेश धोडरे, श्रीकांत नैताम, प्रभाकर कोसरे यांच्यासह हवालदार विजय केंद्रे व होमगार्ड आदींनी केली.