अखेर राजाराम ग्रामपंचायततर्फे नाली सफाईस सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:38 IST2021-09-11T04:38:27+5:302021-09-11T04:38:27+5:30
गुडीगुडम : अहेरी तालुक्याच्या राजाराम ग्राम पंचायत कार्यालय अंतर्गत नाली सफ़ाई व अतिक्रमणाची समस्या कायम आहे. ग्रामसेविकेच्या उदासीन ...

अखेर राजाराम ग्रामपंचायततर्फे नाली सफाईस सुरुवात
गुडीगुडम : अहेरी तालुक्याच्या राजाराम ग्राम पंचायत कार्यालय अंतर्गत नाली सफ़ाई व अतिक्रमणाची समस्या कायम आहे. ग्रामसेविकेच्या उदासीन धाेरणाविराेधात ग्राम पंचायतला कुलूप ठाेकण्याचा इशारा अहेरी पंचायत समितीचे सभापती भास्कर तलांडे यांनी दिला हाेता. या आंदाेलनाच्या इशाऱ्याची दखल घेऊन प्रशासनाने नाली सफाईच्या कामास सुरुवात केली आहे.
यावेळी अहेरी पंचायत समितीचे सभापती भास्कर तलांडे, जिल्हा परिषद सदस्य अजय नैताम, कृषी विस्तार अधिकारी राऊत, पेसा समन्वयक कोठारी व गावकरी उपस्थित होते. सदर काम येत्या सात दिवसांत नाली सफाईचे पूर्ण करून देण्याचे ठरले असल्याने कुलूप ठोकू आंदोलन मागे घेण्यात आले आहे.
दलित वस्ती व गावात संंपूर्ण फिरून गावातील समस्या जाणून घेण्यात आल्या.
100921\img-20210908-wa0029.jpg
सभापती यांनी दखल घेताच नाली सफाई...