अखेर बाेदालदंडवासीयांना मिळाला नकाशा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:44 IST2021-02-17T04:44:41+5:302021-02-17T04:44:41+5:30
काेरची : बेडगाव वनपरिक्षेत्र कार्यालयांतर्गत येत असलेल्या बाेदालदंड येथील रिठ जागेची तीन महिन्यांपूर्वी जीपीएसद्वारे माेजणी करण्यात आली हाेती. मात्र, ...

अखेर बाेदालदंडवासीयांना मिळाला नकाशा
काेरची : बेडगाव वनपरिक्षेत्र कार्यालयांतर्गत येत असलेल्या बाेदालदंड येथील रिठ जागेची तीन महिन्यांपूर्वी जीपीएसद्वारे माेजणी करण्यात आली हाेती. मात्र, नकाशा मिळाला नव्हता. याबाबत लाेकमतने ११ फेब्रुवारी राेजी वृत्त प्रकाशित केले हाेते. त्यानंतर १२ फेब्रुवारी राेजी गावकऱ्यांना वन विभागाच्या कार्यालयात बाेलावून नकाशाची प्रत उपलब्ध करून दिली.
बाेदालदंड हद्दीतील ५४६, ५४७ या क्रमांकाचा प्राणपूर रिठ जागेचा कम्पार्टमेंट पडियालजाेब गावाच्या हद्दीत दाखवीत हाेता. या कम्पार्टमेंटमधील १ हजार ६४ हेक्टर जागेची माेजणी करण्याची मागणी बाेदालदंड ग्रामस्थांनी केली हाेती. त्यानुसार तीन महिन्यांपूर्वी जागेची माेजणी करण्यात आली. मात्र, जागेचा जीपीएस नकाशा उपलब्ध झाला नव्हता. नकाशा देण्यात यावा यासाठी गावकऱ्यांनी वन विभागाकडे अनेक वेळा पाठपुरावा केला. मात्र, नकाशा उपलब्ध झाला नाही. ११ फेब्रुवारी राेजी ‘लाेकमत’ने याबाबत वृत्त प्रकाशित केले हाेते. नागरिक आंदाेलन करतील, असा इशारा वृत्तातून देण्यात आला हाेता. वन परिक्षेत्राधिकारी विकास भाेसले यांनी या वृत्ताची दखल घेत बाेदालदंडवासीयांना कार्यालयात बाेलाविले. जागेच्या नकाशाची प्रत बाेदालदंडचे सरपंच दिलीप केरामी, ग्रामसभा अध्यक्ष रामसाय केरामी, सचिव जगदीश बाेगा, मन्नालाम केरामी, दामेसाय केरामी, दिनेश बाेगा यांच्याकडे सुपूर्द केली.