अखेर न.प.ची सभा झाली ऑफलाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2020 05:00 AM2020-12-12T05:00:00+5:302020-12-12T05:00:16+5:30

गडचिराेली नगर परिषदेची यापूर्वीची सर्वसाधारण सभा २६ डिसेंबर २०१९ राेजी पार पडली हाेती. वर्षभरापासून सभा न झाल्याने नवीन विकासकामांना ब्रेक लागला हाेता. अनेक अडथळ्यानंतर ११ डिसेंबर राेजी ऑनलाईन सभा निश्चित करण्यात आली. मात्र ऑनलाईन सभेला बहुतांश नगरसेवकांनी विराेध दर्शविला. इतर विभागांच्या सभा सभागृहात हाेत आहेत तर गडचिराेली नगर परिषदेची सभा सभागृहात ऑफलाईन पद्धतीने घेण्यात काय अडचणी आहेत? असा प्रश्न नगरसेवकांकडून उपस्थित केला जात हाेता.

Finally, the NP meeting was held offline | अखेर न.प.ची सभा झाली ऑफलाईन

अखेर न.प.ची सभा झाली ऑफलाईन

Next
ठळक मुद्देवर्षभरानंतर मिळाली संधी : नगरसेवकांचा मनसुबा पूर्ण, अनेक महत्वाच्या कामांना मंजुरी

  लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : स्थानिक नगर परिषदेची सर्वसाधारण सभा ११ डिसेंबर रोजी ऑनलाईन पद्धतीने आयाेजित केली हाेती. पण इंटरनेट नेटवर्क काम करीत नसल्याने अखेर ही सभा ऑफलाईन पद्धतीने नगराध्यक्ष यांच्या कक्षात पार पडली. ही सभा ऑफलाईन पद्धतीनेच व्हावी यासाठी बहुतांश नगरसेवक आग्रही होते. अखेर त्यांचा मनसुबा पूर्ण झाला.
गडचिराेली नगर परिषदेची यापूर्वीची सर्वसाधारण सभा २६ डिसेंबर २०१९ राेजी पार पडली हाेती. वर्षभरापासून सभा न झाल्याने नवीन विकासकामांना ब्रेक लागला हाेता. अनेक अडथळ्यानंतर ११ डिसेंबर राेजी ऑनलाईन सभा निश्चित करण्यात आली. मात्र ऑनलाईन सभेला बहुतांश नगरसेवकांनी विराेध दर्शविला. इतर विभागांच्या सभा सभागृहात हाेत आहेत तर गडचिराेली नगर परिषदेची सभा सभागृहात ऑफलाईन पद्धतीने घेण्यात काय अडचणी आहेत? असा प्रश्न नगरसेवकांकडून उपस्थित केला जात हाेता. याबाबत नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांचीही भेट घेऊन सभा ऑफलाईन घेण्याचे  निर्देश नगर परिषदेला द्यावे, अशी मागणी केली. मात्र सभा ऑनलाईनच घेण्याचे शासनाचे  निर्देश आहेत, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले. त्यामुळे काहीही पर्याय नसल्याने ऑनलाईन सभेस नगरसेवक तयार झाले होते.
शुक्रवारी दुपारी १२ वाजता ऑनलाईन सभेचे नियोजन करण्यात आले. नगरसेवकांना नगर परिषदेच्या इमारतीतच वेगवेगळ्या विभागांमध्ये बसण्याची व्यवस्था करण्यात आली हाेती. मात्र बहुतांश नगरसेवक बांधकाम  विभागातच बसले हाेते. 
नगराध्यक्ष व तीन सभापती नगराध्यक्षांच्या कक्षात हाेते. चार नगरसेवक ऑनलाईन उपस्थित हाेते. दाेन नगरसेवक मात्र सभेला अनुपस्थित हाेते. 

सभेत इंटरनेटचा व्यत्यय
ठरल्याप्रमाणे दुपारी १२ वाजता सभेला झुम मिटींग ॲपवर सुरूवात झाली. सर्वप्रथम नगर सेवकांच्या हजेरीला सुरूवात झाली. हजेरी सुरू असतानाच इंटरनेट स्लाे झाल्याने एकमेकांचा आवाज येत नसल्याची तक्रार नगरसेवकांनी करण्यास सुरूवात केली. यावर ताेडगा काढून सभा नगराध्यक्षांच्या सभागृहात ऑफलाईन पद्धतीने घेण्याचे ठरविण्यात आले. उपस्थित नगरसेवकांच्या अनुमतीने अखेर ऑफलाईन पद्धतीने सभागृहात दुपारी १ वाजतापासून सभेला सुरूवात झाली.

रात्री उशिरापर्यंत चालली सभा
सभेत एकूण ७२ विषय चर्चेसाठी ठेवण्यात आले हाेते. दुपारी १ वाजता सुरू झालेली सर्वसाधारण सभा रात्री ८ वाजेपर्यंत सुरूच हाेेती. अनेक विषयांवर सभेत खमंग चर्चा झाली. शुक्रवारच्या सभेत काही विषय अत्यंत महत्त्वाचे असल्याने त्या विषयांवर समाेरासमाेर चर्चा हाेणे आवश्यक हाेते. त्यामुळेच सर्वसाधारण सभा ऑनलाईन घेण्यास नगरसेवकांचा  विराेध हाेता, असे नगरसेवकांनी सांगितले. दरम्यान या सभेत काेणते निर्णय झाले, याबाबतची माहिती मिळू शकली नाही.

Web Title: Finally, the NP meeting was held offline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.