अखेर ‘तो’ सांडपाण्याने भरलेला नळाचा खड्डा बुजविला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:22 IST2021-07-23T04:22:43+5:302021-07-23T04:22:43+5:30

आरमोरी शहरातील प्रभाग क्रमांक ३ बाजारपेठमधील प्रगती चौकाजवळ सार्वजनिक नळ आहे. हा नळ ३ ते ४ फूट ...

Finally, he dug a pit filled with sewage | अखेर ‘तो’ सांडपाण्याने भरलेला नळाचा खड्डा बुजविला

अखेर ‘तो’ सांडपाण्याने भरलेला नळाचा खड्डा बुजविला

आरमोरी शहरातील प्रभाग क्रमांक ३ बाजारपेठमधील प्रगती चौकाजवळ सार्वजनिक नळ आहे. हा नळ ३ ते ४ फूट खोल असलेल्या सिमेंट टाक्यांमध्ये लावण्यात आला होता. या सार्वजनिक नळाला लागूनच नाली आहे. त्यामुळे नालीचे सांडपाणी सार्वजनिक नळाच्या खोल टाक्यात जमा होत होते. त्यामुळे त्या ठिकाणी अशुद्ध सांडपाणी साचून दुर्गंधी पसरली होती. या सार्वजनिक नळाचे पाणी नागरिक पिण्यासाठी वापरात असल्याने वॉर्डातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते.

वॉर्डातील नागरिकांनी ही बाब नगरपरिषद प्रशासनाच्या निदर्शनास आणून देऊनसुद्धा त्याकडे दुर्लक्ष होत होते. नागरिकांच्या आरोग्याशी खेळणारी गंभीर समस्या लोकमतने उचलून धरताच न. प. प्रशासनाने तत्काळ दखल ते टाके बुजविले. जमिनीच्या वर नव्याने नळाची जोडणी केल्याने वाॅर्डातील नागरिकांनी समाधान व्यक्त करून लोकमतचेही आभार मानले.

220721\img_20210722_183327.jpg

सार्वजनिक नळाच्या ठिकाणी मुरूम टाकून बुजविण्यात आलेला हाच तो टाका व नव्याने जोडणी करण्यात आलेले नळ

Web Title: Finally, he dug a pit filled with sewage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.