अखेर दीड वर्षानंतर ब्रम्हपुरी - रांगी - धानोरा बसफेरी सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:41 IST2021-08-21T04:41:30+5:302021-08-21T04:41:30+5:30
ब्रम्हपुरी - आरमाेरी - रांगी - धाराेना बसफेरी पूर्ववत सुरू करण्याच्या मागणीसाठी चिमूर विधानसभा क्षेत्राचे शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्रा. ...

अखेर दीड वर्षानंतर ब्रम्हपुरी - रांगी - धानोरा बसफेरी सुरू
ब्रम्हपुरी - आरमाेरी - रांगी - धाराेना बसफेरी पूर्ववत सुरू करण्याच्या मागणीसाठी चिमूर विधानसभा क्षेत्राचे शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्रा. अमृत नखाते यांच्या नेतृत्त्वात ब्रम्हपुरीच्या उपविभागीय अधिकारी क्रांती डोंबे, राज्य मार्ग परिवहन विभागीय नियंत्रक व ब्रम्हपुरीच्या आगार प्रमुखांना निवेदन दिले हाेते. ही बसफेरी आठ दिवसात सुरू न झाल्यास शिवसेनेच्या वतीने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला हाेता. या निवेदनाची दखल घेत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ब्रह्मपुरी आगारातून ब्रह्मपुरी - आरमोरी - रांगी - धानोरा ही बसफेरी पूर्ववत सुरू करण्यात आली. प्रा. अमृत नखाते पूजन करून बसफेरी रवाना केली. यावेळी शिवसेना पदाधिकारी श्यामराव भानारकर, रापमचे विभागीय सल्लागार रमाकांत अरगेलवार, वाहतूक नियंत्रक पुरुषोत्तम सोनकुसरे, चालक तुषार राऊत, वाहक गोकुळ सहारे, नीलिमा साखरे, वाहतूक नियंत्रक राजकुमार भडके, प्रिया ठोंबरे, मोहली येथील संदीप नारचुलवार व प्रवासी आदी उपस्थित होते._
200821\img-20210819-wa0037.jpg
शिवसेनेच्या प्रयत्नाने ब्रम्हपुरी-रांगी-धानोरा बसफेरी सुरू*_