पाेट भरण्याची मारामार, तरीही भरावा लागताे टॅक्स
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:40 IST2021-09-22T04:40:16+5:302021-09-22T04:40:16+5:30
जगातल्या प्रत्येक व्यक्तीला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या कर द्यावाच लागतो. सरकार प्रत्येक वस्तूवर कर आकारते. त्यामुळे ती वस्तू मूळ किमतीपेक्षा ...

पाेट भरण्याची मारामार, तरीही भरावा लागताे टॅक्स
जगातल्या प्रत्येक व्यक्तीला प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या कर द्यावाच लागतो. सरकार प्रत्येक वस्तूवर कर आकारते. त्यामुळे ती वस्तू मूळ किमतीपेक्षा महाग हाेते. यात ग्राहक प्रत्यक्ष कर भरत नाही. मात्र अधिकच्या रकमेतून सरकारकडे त्यातील काही रक्कम जमा हाेते. त्याला अप्रत्यक्ष कर असे म्हणतात. बहुतांश नागरिक अप्रत्यक्ष करच भरत असतात. या कराबाबतही नागरिक बरेच जागरूक असल्याचे लाेकमतने केलेल्या पाहणीत दिसून आले आहे. तर काही व्यावसायिक, उद्याेजक, भाजीपाला विक्रेते, दुकानदार विविध प्रकारच्या करांचा स्वत: भरणा करतात. त्यामुळे ते तर अतिशय जागरूक असल्याचे दिसून आले.
बाॅक्स
आपण भरता का
ऑटाेचालक - ॲटाे खरेदी करतेवेळी सरकारकडून राेड टॅक्स आकारला जाते. यामुळे ॲटाेची किंमत हजाराे रुपयांनी वाढते. मात्र रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. याचा त्रास आपल्यासह प्रवाशांनाही हाेते.
भाजीपाला विक्रेते: नगर परिषद दर दिवशी चिटीच्या स्वरूपात भाजीपाला विक्रेत्यांकडून कर गाेळा करते. मात्र काेणतीही सुविधा पुरवत नाही. केवळ बसण्याचे पैसे वसूल करते.
दुकानदार: सरकारकडून विविध कर आकारले जातात. या पैशाचा सदुपयाेग हाेण्याची गरज आहे. मात्र शासनाचा बराचसा पैसा अनावश्यक बाबींवर खर्च हाेत असल्याचे दिसून येते.
सेक्युरिटी गार्ड : आपण काेणालाच प्रत्यक्ष कर देत नाही. तरीही भारताचा नागरिक म्हणून काही सुविधांची निश्चितच अपेक्षा राहील.
गृहिणी : शासनाने लावलेल्या विविध करांमुळेच वस्तू महाग झाल्या आहेत. महागाई वाढविण्यात सरकारचाच फार माेठा वाटा आहे.
विद्यार्थी: आजची मुले हे देशाचे भावी आधारस्तंभ आहेत. त्यामुळे ही पिढी सक्षम बनविण्याची गरज आहे. प्रत्येकाला राेजगार किंवा स्वयंराेजगार मिळेल, अशी व्यवस्था करण्याची गरज आहे.