लोहार समाजाने संघटित होऊन हक्कासाठी लढा द्यावा
By Admin | Updated: March 27, 2017 00:49 IST2017-03-27T00:49:56+5:302017-03-27T00:49:56+5:30
लोहार समाजाची संख्या महाराष्ट्रात मोठी आहे. या समाजाच्या अनेक समस्या आहेत. विकासापासून या समाजाचे बरेच लोक मागासलेले आहेत.

लोहार समाजाने संघटित होऊन हक्कासाठी लढा द्यावा
सूर्यवंशी यांचे आवाहन : गडचिरोलीत लोहार समाजाचा वधू वर परिचय व गुणवंतांचा सत्कार मेळावा
गडचिरोली : लोहार समाजाची संख्या महाराष्ट्रात मोठी आहे. या समाजाच्या अनेक समस्या आहेत. विकासापासून या समाजाचे बरेच लोक मागासलेले आहेत. त्यामुळे लोहार समाज बांधवांनी संघटीत होऊन आपल्या संविधानिक अधिकार व हक्कासाठी झटावे, असे आवाहन वैदर्भीय गाडीलोहार व तत्सम जाती महासंघ नागपूरचे माजी अध्यक्ष रा. दा. सूर्यवंशी यांनी केले.
महाराष्ट्र राज्य लोहार व तत्सम समाज संघ गडचिरोलीच्या वतीने रविवारी स्थानिक केशव-कमल सभागृहात आयोजित विश्वकर्मा जयंती, वधू वर परिचय, मान्यवर व गुणवंतांच्या सत्कार मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन नगराध्यक्ष योगीता पिपरे यांच्या हस्ते झाले. यावेळी अध्यक्षस्थानी वैदर्भीय गाडी लोहार व तत्सम जाती महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. रा. गो. उकेकर उपस्थित होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून नगरसेवक प्रमोद पिपरे, चरणदास बावणे, मा. भा. पडघन, सु. फ. मांडवकर, एस. एस. बावणे, फ. दौ. शेंडे, न.प. सभापती अल्का पोहणकर, एस. एन. शेंडे, राजपाल बावणकर, विजय पोहणकर, विनायक आत्राम, चिंचोलकर, दुधराम बोरकर आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी नगराध्यक्ष योगीता पिपरे, नगरसेवक प्रमोद पिपरे यांच्यासह लोहार समाज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. या मेळाव्यादरम्यान समाजातील आठ वधू व एक उपवर अशा एकूण नऊ उपवर-वधूंनी आपला परिचय दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष सुरेश मांडवगडे, संचालन अनिता कुमरे, संजय मडावी यांनी केले आभार एस. आर. बावणे यांनी मानले. (स्थानिक प्रतिनिधी)
या मान्यवर व गुणवंतांचा झाला गौरव
लोहार व तत्सम समाज संघ गडचिरोलीच्या वतीने या कार्यक्रमात नगराध्यक्ष योगीता पिपरे, नगरसेवक प्रमोद पिपरे यांचा शाल, श्रीफळ व सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तसेच न.प. सभापती अल्का पोहणकर, प्रा. चरणदास बावणे, सदाशिव मेश्राम, सुरेश मांडवगडे, अनिल मेश्राम, प्रकाश कुमरे, शिवराम कोसरे यांचाही गौरव करण्यात आला.
इयत्ता दहावीच्या परीक्षेत ७० टक्क्यापेक्षा अधिक गुण घेणाऱ्या लोहार समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यामध्ये धनंजय सुनिलराव वाघाडे, वैभव नरेश बावणे, चेतन गुरूदास मडावी, सोनम बापुजी उईके, प्रिया पटवारी घुग्गुसकर, गणेश कमलाकर मेश्राम यांचा समावेश आहे.