काेराेनाबाधित १५ रुग्णांनी गमावला जीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 04:37 IST2021-04-24T04:37:36+5:302021-04-24T04:37:36+5:30
जिल्ह्यात शुक्रवारी काेराेनाबाधित १५ लाेकांचा मृत्यू झाला. यामध्ये ६७ वर्षीय महिला ब्रह्मपुरी, जि. चंद्रपूर, ६७ वर्षीय पुरुष ...

काेराेनाबाधित १५ रुग्णांनी गमावला जीव
जिल्ह्यात शुक्रवारी काेराेनाबाधित १५ लाेकांचा मृत्यू झाला. यामध्ये ६७ वर्षीय महिला ब्रह्मपुरी, जि. चंद्रपूर, ६७ वर्षीय पुरुष जि. चंद्रपूर, ५४ वर्षीय पुरुष नवेगाव गडचिरोली, ६५ वर्षीय महिला आरमोरी, ३४ वर्षीय पुरुष पोलीस कॉलनी, गडचिरोली, ५९ वर्षीय पुरुष विवेकांनदनगर, गडचिरोली, ४० वर्षीय पुरुष वडसा, ५४ वर्षीय पुरुष कुरखेडा, ६५ वर्षीय महिला वडसा, ७२ वर्षीय पुरुष विसाेरा, ता. वडसा, ६९ वर्षीय पुरुष आरमोरी, ५२ वर्षीय पुरुष अहेरी, ४४ वर्षीय पुरुष आमगाव, ता. वडसा, ३३ वर्षीय महिला चंद्रपूर, ४० वर्षीय पुरुष रामनगर गडचिरोली यांचा समावेश आहे. जिल्ह्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७४.८९ टक्के, सक्रिय रुग्णांचे प्रमाण २२.४२ टक्के तर मृत्युदर १.६९ टक्के आहे.
नवीन बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील १५७, अहेरी तालुक्यातील २६, आरमोरी ५५, चामोर्शी तालुक्यातील ५७, धानोरा तालुक्यातील ३५, एटापल्ली तालुक्यातील २३, कोरची तालुक्यातील २९, कुरखेडा तालुक्यातील ३९, मुलचेरा तालुक्यातील २५, सिरोंचा तालुक्यातील ९ तर वडसा तालुक्यातील ४२ जणांचा समावेश आहे. तर कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांमध्ये गडचिरोलीमधील १३८, अहेरी ६, आरमोरी २५, भामरागड ५, चामोर्शी ११, धानोरा ८, एटापल्ली १०, मुलचेरा २, सिरोंचा ३, कोरची १२, कुरखेडा १९, तसेच देसाईगंज येथील ४४ जणांचा समावेश आहे.