नक्षलग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचा सत्कार
By Admin | Updated: September 6, 2016 00:53 IST2016-09-06T00:53:33+5:302016-09-06T00:53:33+5:30
नक्षल विरोधी अभियान नागपूर व मैत्री परिवार संस्था यांच्या वतीने महाराष्ट्र दर्शन सुर्वण जयंती सहलीत सहभागी झालेल्या...

नक्षलग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचा सत्कार
नागपुरात कार्यक्रम : विशेष पोलीस महानिरीक्षक उपस्थित
गडचिरोली : नक्षल विरोधी अभियान नागपूर व मैत्री परिवार संस्था यांच्या वतीने महाराष्ट्र दर्शन सुर्वण जयंती सहलीत सहभागी झालेल्या गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील विद्यार्थी व पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा सत्कार रविवारी नागपूर येथे करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार होते. यावेळी विशेष अतिथी म्हणून नक्षल विरोधी अभियानाचे विशेष पोलीस महानिरिक्षक शिवाजी बोडखे, मैत्री परिवार संस्थेचे सचिव प्रमोद पेंडके, संजय नखाते, डॉ. नरेंद्र भुसारी आदी उपस्थित होते.
याप्रसंगी विशेष पोलीस महानिरिक्षक शिवाजी बोडखे म्हणाले की, नक्षलवाद्यांच्या चुकीच्या आवाहनांना बळी न पडता शिक्षणाच्या माध्यमातून स्वत:चा व आपल्या गावाचा विकास करून सर्व समाजाचे विकासदूत बनावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी प्रंचित पोरेड्डीवार यांनी विद्यार्थ्यांनी संकुचितपणा न बाळगता जीवनाकडे सकारात्मक दृष्टीकोणातून बघावे, मनात आत्मविश्वास निर्माण करून स्वत:ची प्रगती केल्यास गडचिरोलीतील विद्यार्थी कुठेही मागे पडणार नाही, असे सांगितले. यावेळी दुर्गम भागातील विविध शाळांच्या ४३ मुले व ३८ मुली यांचा भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
गडचिरोली पोलिस दलातील अधिकारी सहायक पोलिस निरीक्षक डी. डब्लू. मंडलवार, नक्षल विरोधी अभियानाचे बी.डी. झिंगरे, पोलिस उपनिरीक्षक समु चौधरी, सहायक पोलिस उपनिरीक्षक पांडुरंग चाफले, दामोदर पदा, परिमल बाला, सचिन उसेंडी, फुला कुमोटी, शोभा खोब्रागडे, शैला आत्राम, परशुराम निमरड यांचाही सत्कार करण्यात आला.