मुलाच्या आत्महत्येनंतर वडिलांचाही गळफास; सात महिन्यांनंतर पुनरावृत्ती
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2020 19:16 IST2020-02-25T19:16:08+5:302020-02-25T19:16:20+5:30
साल्हे गावालगतच्या जंगलात श्यामलाल सुकेल नैताम (५५) यांनी झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.

मुलाच्या आत्महत्येनंतर वडिलांचाही गळफास; सात महिन्यांनंतर पुनरावृत्ती
कोरची (गडचिरोली) : तालुक्याच्या साल्हे गावालगतच्या जंगलात श्यामलाल सुकेल नैताम (५५) यांनी झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. विशेष म्हणजे नैताम यांच्या मुलानेही सात महिन्यांपूर्वी त्याच झाडालगतच्या दुस-या झाडावर गळफास घेऊन आत्महत्या केली होती.
गावापासून ५०० मीटर अंतरावरील जंगलात एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत श्यामलाल नैताम यांचा मृतदेह सोमवारी दुपारी आढळला. तो शेतकरी होता. मोठा मुलगा संदीप याने ११ जून २०१९ ला याच जंगलात गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आता वडिलांनी सुद्धा त्याच ठिकाणी आत्महत्या केल्याने हा चर्चेचा विषय झाला आहे. काही दिवसांपासून श्यामलाल याचे पत्नीसोबत मतभेद होते. त्यातूनच त्यांच्यात भांडण झाले. याच भांडणातून श्यामलाल याने सोमवारी दुपारी २ ते २.३० वाजताच्या सुमारास जंगलात जाऊन सिहन्याच्या झाडाला गळफास घेतल्याचे पोलिसांनी सांगितले.