शेतकऱ्यांना ३० पर्यंत करावी लागणार धान विक्रीसाठी नाेंदणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:41 IST2021-09-21T04:41:00+5:302021-09-21T04:41:00+5:30
चामोर्शी येथे शासनाच्या आधारभूत किमत खरेदी योजनेंतर्गत शेतमाल धान (भात) खरेदी करण्याकरिता २० सप्टेंबरपासून नोंदणी करण्यास सुरुवात झाली आहे. ...

शेतकऱ्यांना ३० पर्यंत करावी लागणार धान विक्रीसाठी नाेंदणी
चामोर्शी येथे शासनाच्या आधारभूत किमत खरेदी योजनेंतर्गत शेतमाल धान (भात) खरेदी करण्याकरिता २० सप्टेंबरपासून नोंदणी करण्यास सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांनी धान उत्पादन घेतल्याची नोंद असलेला स्वतःचा सातबारा, गाव नमुना- ८, आधारकार्डची झेराॅक्स, बँक पासबुकची झेराॅक्स, संमतीपत्र, मोबाइल क्रमांक आदी कागदपत्रे खरेदी केंद्रांच्या ठिकाणी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजतापर्यंत नोंदणी करण्यासाठी जमा करण्यात यावे. सर्व शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी ॲपमध्ये स्वत:च्या शेतमालाची नोंद करूनच सन २०२१-२२ या चालू सत्रातील सातबारे दिलेल्या ठिकाणी जमा करावे, असे चामोर्शी तालुका सहकारी खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष गुरुदास बुधरी यांनी केले आहे.
बाॅक्स
येथे करावे कागदपत्र सादर
चामोर्शी, गणपूर व कुनघाडा खरेदी केंद्रांतर्गत येणाऱ्या सर्व गावातील शेतकऱ्यांनी चामोर्शी तालुका सहकारी खरेदी-विक्री संस्थेच्या कार्यालयात सातबारे जमा करावे. येणापूर व सुभाषग्राम खरेदी केंद्रांतर्गत येणाऱ्या शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार कार्यालय, चित्तरंजनपूर (येणापूर) येथे सातबारे जमा करावे. आष्टी व गणपूर खरेदी केंद्रांतर्गत येणाऱ्या शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार समिती कार्यालय आष्टी येथे सातबारे जमा करावे. मुलचेरा, सुंदरनगर व मथुरानगर केंद्रांतर्गत येणाऱ्या शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार समिती गोदाम, विवेकानंदपूर येथे नाेंदणी करावी, असे आवाहन केले आहे.
बाॅक्स
गडचिराेलीसाठी येथे करावी नाेंदणी
खरीप पणन हंगाम २०२१-२२ करिता मार्केटिंग फेडरेशनकडे धान विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह ३० सप्टेंबरपूर्वी कृषी उत्पन्न बाजार समिती येथे नोंदणी करावी, असे आवाहन कृषी औद्योगिक खरेदी-विक्री सह. संस्थेचे सचिव सुधाकर वैरागडे यानी केले आहे. गडचिरोली तालुक्यात मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने खरेदी प्रक्रिया कृषी औद्योगिक खरेदी-विक्री सहकारी संस्था कुरखेडा यांच्यामार्फतने राबविण्यात येत आहे. शेतीचा सातबारा पोर्टलवर ऑनलाइन नोंदणीकरिता आवश्यक कागदपत्रांसह ३० सप्टेंबरपर्यंत नोंदणी करणे आवश्यक असल्याने शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समिती गडचिरोली येथे संपर्क साधावा, असे आवाहन वैरागडे यांनी केले आहे.