सिंचन सुविधा नसलेल्या शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 05:01 IST2020-07-19T05:00:00+5:302020-07-19T05:01:04+5:30

रोहणी नक्षत्राला पावसाने शुभवर्तमान देत तालुक्यात हजेरी लावली. त्यातच हवामान खात्यााने यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. पावसाच्या या सर्व शुभवार्ता पाहून शेतकऱ्यांनी मृग नक्षत्रातच धानाचे पऱ्हे टाकले. मात्र त्यानंतरचे दोन नक्षत्र कोरडे गेल्याने धान रोवणीचे काम लांबणीवर पडले.

Farmers who do not have irrigation facilities look at the sky | सिंचन सुविधा नसलेल्या शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे

सिंचन सुविधा नसलेल्या शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे

ठळक मुद्देसरासरीपेक्षा कमी पाऊस । पऱ्हे असूनही रोवणीचे काम थांबले

लोकमत न्यूज नेटवर्क
देसाईगंज : गतवर्षीच्या तुलनेत यंदा आतापर्यंत कमी पाऊस झाला आहे. सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने सिंचन सुविधा नसलेले शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. सिंचन, विहीर, मोटारपंप व इतर कोणत्याही सिंचन सुविधा नसलेल्या व १०० टक्के पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतातील धानपीक रोवणीचे काम थांबले आहे. पऱ्हे रोवणीयोग्य झाले असूनही पाऊस नसल्याने बऱ्याच शेतकऱ्यांनी रोवणीचे काम सुरू केले नाही. परिणामी तालुक्यातील बऱ्याच शेतकऱ्यांच्या नजरा आता आकाशाकडे लागल्या आहेत.
रोहणी नक्षत्राला पावसाने शुभवर्तमान देत तालुक्यात हजेरी लावली. त्यातच हवामान खात्यााने यावर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. पावसाच्या या सर्व शुभवार्ता पाहून शेतकऱ्यांनी मृग नक्षत्रातच धानाचे पऱ्हे टाकले. मात्र त्यानंतरचे दोन नक्षत्र कोरडे गेल्याने धान रोवणीचे काम लांबणीवर पडले.
तालुक्यात सद्य:स्थितीत गाढवी नदीच्या अलिकडील भागात धानाचे पऱ्हे वाचविण्यासाठी इटियाडोह धरणाचे पाणी सोडण्यात आले आहे. परंतु हे पाणी शेवटच्या शेतजमिनीपर्यंत अद्यापही पोहोचत नसल्याची ओरड काही शेतकºयांनी केली आहे.
गाढवी नदीच्या पलिकडील बराच भाग कोरडवाहू असून तेथील शेतकरी पूर्णपणे पावसाच्या भरवशावर अवलंबून आहेत. येत्या आठवडाभरात तालुक्यात दमदार पाऊस न झाल्यास पऱ्हेकरपण्याची शक्यता आहे.

Web Title: Farmers who do not have irrigation facilities look at the sky

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :agricultureशेती