शेतकऱ्यांना बोनसची प्रतीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 00:59 IST2019-08-20T00:59:11+5:302019-08-20T00:59:59+5:30
तालुक्यातील शेतकऱ्यांनी जानेवारी ते मार्च २०१८ मध्ये आधारभूत धान खरेदी योजनेअंतर्गत धानाची विक्री शासनाच्या केंद्रावर केली होती. परंतु अद्यापही या शेतकऱ्यांना बोनसची रक्कम मिळाली नाही. अनेक शेतकरी बोनसपासून वंचित आहेत.

शेतकऱ्यांना बोनसची प्रतीक्षा
लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : तालुक्यातील शेतकऱ्यांनी जानेवारी ते मार्च २०१८ मध्ये आधारभूत धान खरेदी योजनेअंतर्गत धानाची विक्री शासनाच्या केंद्रावर केली होती. परंतु अद्यापही या शेतकऱ्यांना बोनसची रक्कम मिळाली नाही. अनेक शेतकरी बोनसपासून वंचित आहेत. सध्या खरीप हंगाम सुरू असल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक अडचण निर्माण झाली आहे.
तालुक्यातील नगरम, सूर्यापल्ली, राजन्नापल्ली, आरडा, पेंटीपाका, तुमनूर आदी गावातील शेतकºयांनी मागीलवर्षी जानेवारी ते मार्च या तीन महिन्यांच्या कालावधीत आधारभूत धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री केली होती. परंतु या तीन महिन्यांत विक्री करण्यात आलेल्या धानाचे बोनस शेतकऱ्यांना मिळाले नाही. सदर बोनस द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी सोमवारी तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या निवेदनाद्वारे केली.
नगरम परिसरातील शेतकऱ्यांनी आधारभूत धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री केली होती. या परिसरात सिरोंचा तसेच तेलंगणा राज्यातील अनेक व्यापारी धानाची खरेदी करतात. परंतु धान बोनस मिळावा, यासाठी शेतकऱ्यांनी आधारभूत धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री केली होती. परंतु दीड वर्षाचा कालावधी उलटूनही शेतकऱ्यांना बोनसची रक्कम मिळाली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष व्यक्त होत आहे. सध्या खरीप हंगामाचे दिवस आहेत. शेतकऱ्यांना धान रोवणी मजुरी, खते, कीटकनाशके, नांगरणी, चिखलणी भाडे देण्याकरिता पैशांची आवश्यकता आहे. परंतु अद्यापही रक्कम जमा न झाल्याने शेतकरी संबंधित कार्यालयात हेलपाटे मारत आहेत.
शेतकऱ्यांना बोनस त्वरित द्यावी, अशी मागणी तफीम हुसैन, जम्पय्या दुर्गम, तिरूपती बेडके, पोचम जिमडे, व्यंकटी कुमरे, बापू कोडगून, सडवली दुर्गम, सडवली कुमरी, व्यंकटी दुर्गम, श्रीधर येरोला, लक्ष्मण सिरागी, सडवली पोलपोटी, लक्ष्मीनारायण कंडना, येरय्या कुमरी, समय्या दुर्गम, समय्या जक्कू दुर्गम, कैैसर शेख, दुंतरी कुमरी, रमेश बेडके, राजनलू नरडंगी, राजन्ना कुमरी, एम.के.आरवेली व शेतकरी उपस्थित होते.