पीक कर्जासाठी शेतकऱ्यांची धावपळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 00:48 IST2018-06-14T00:48:28+5:302018-06-14T00:48:28+5:30

पीक कर्जासाठी शेतकऱ्यांची धावपळ
लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : सन २०१८-१९ या वर्षातील खरीप हंगामासाठी शासनाने सर्व राष्ट्रीयकृत बँकांसह जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले आहेत. खरीप हंगामासाठी अनेक शेतकरी पीक कर्जासाठी बँकेत चकरा मारतात. पावसाळा सुरू झाल्याने शेतकºयांनी पीक कर्जासाठी धावपळ वाढली आहे.
चामोर्शी तालुक्याच्या येनापूर येथे बँक आॅफ इंडिया शाखा आहे. या बँक शाखेत परिसरातील काही शेतकरी शेती कर्ज माफी व नवीन पीक कर्जाबाबत विचारपूस करण्यासाठी आले होते. तसेच काही शेतकरी नवीन पीक कर्ज घेण्यासाठी आले होते. मात्र यावेळी बँक शाखेत व्यवस्थापकासह अनेक कर्मचारी गैरहजर होते. त्यामुळे शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागला. यावेळी पं.स.सदस्या वंदना विनोद गौरकर उपस्थित होत्या. त्यांनी सदर प्रकाराबाबत खा.अशोक नेते, आ.डॉ.देवराव होळी यांना भ्रमणध्वनीवरून माहिती दिली.