रानडुकराचा धुडगूस -त्रस्त शेतकऱ्यांना मदत नाही
By Admin | Updated: August 6, 2015 02:17 IST2015-08-06T02:17:34+5:302015-08-06T02:17:34+5:30
बोडधा येथील शालिकराम सुकरू गायकवाड यांनी तीन वर्षांपूर्वी आपल्या सर्वे क्र. १८८, १८३, १८५ शेतात ऊस पिकाची लागवड केली.

रानडुकराचा धुडगूस -त्रस्त शेतकऱ्यांना मदत नाही
तीन वर्षे उलटले : वनाधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे
कोरेगाव/चोप : बोडधा येथील शालिकराम सुकरू गायकवाड यांनी तीन वर्षांपूर्वी आपल्या सर्वे क्र. १८८, १८३, १८५ शेतात ऊस पिकाची लागवड केली. रानडुकराने धुमाकूळ घालून ऊस पिकाची नासाडी केली. त्यानंतर वनपरिक्षेत्राधिकारी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. मात्र संबंधित नुकसानग्रस्त शेतकऱ्याला तीन वर्ष उलटूनही नुकसान भरपाई मिळाली नाही.
गेल्या दोन ते तीन वर्षांपासून गडचिरोली, देसाईगंज, धानोरा, आरमोरी वनपरिक्षेत्रांतर्गत असलेल्या जंगल भागातील रानडुकर व इतर प्राणी लगतच्या शेतात धुमाकूळ घालून अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान केले. या नुकसानीच्या घटनेचा वनाधिकाऱ्यांनी पंचनामा केला. तसेच शासनाकडे पत्र पाठवून संबंधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची शिफारस केली. मात्र अद्यापही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळाली नाही. प्राण्यांच्या धुडगुसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत द्यावी. (वार्ताहर)