कृषी सहायकांना इतर कामात गुंतवल्याने शेतकरी अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2019 00:36 IST2019-07-20T00:35:09+5:302019-07-20T00:36:26+5:30
खरीप हंगामात शेतकऱ्यांना मार्गदर्शनाची गरज असताना कृषी सहायक व तंत्रज्ञानात पंतप्रधान किसान योजनेच्या कामात जुंपल्याने शेतकरी अडचणीत आला असून कृषी सहायकांना तत्काळ शेतकरी मार्गदर्शनासाठी मोकळे करावे, असे आवाहन शेतकऱ्यांनी केले.

कृषी सहायकांना इतर कामात गुंतवल्याने शेतकरी अडचणीत
लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : खरीप हंगामात शेतकऱ्यांना मार्गदर्शनाची गरज असताना कृषी सहायक व तंत्रज्ञानात पंतप्रधान किसान योजनेच्या कामात जुंपल्याने शेतकरी अडचणीत आला असून कृषी सहायकांना तत्काळ शेतकरी मार्गदर्शनासाठी मोकळे करावे, असे आवाहन शेतकऱ्यांनी केले.
तालुका कृषी कार्यालयामार्फत खरीप हंगामात अनेक महत्त्वाची कामे करावयाची असतात. राष्टÑीय अन्न सुरक्षा अभियान योजनेंतर्गत पीक प्रात्यक्षिक, भाऊसाहेब फुंडकर फळबास लागवड योजना, पीक विमा प्रचार व प्रसिध्दी, कीड व रोग सर्वेक्षण, शेती शाळा आदी अंतर्गत महत्त्वाची कामे असताना कृषी सहायकांना पंतप्रधान किसान योजनेच्या कामात जुंपण्यात आले. शेतकºयांचे खाते नंबर व आधार नंबर घेऊन तहसील कार्यालयात अपलोड करणे आदी काम कृषी सहायक करीत आहेत. तलाठी, ग्रामसेवक व इतर कर्मचारी देखील ही कामे करू शकत असताना कृषी सहायकांना या कामात लावल्याने शेतकरी मार्गदर्शनापासून वंचित झाले आहेत. आधीच दुष्काळसदृश्य स्थिती असून शेतकरी मोठ्या संकटात सापडला असताना शेतकरी कृषी सहायकाच्या सल्ल्याला मुकला आहे. परिणामी शेतकरी अस्वस्थ असून त्यांच्यात असंतोष निर्माण झाला आहे. उपविभागीय अधिकाºयांच्या निर्देशानुसार कृषी सहायकांना ही कामे दिल्याची चर्चा कृषी कार्यालयात दिसून आली.
या संदर्भात प्रभारी कृषी अधिकारी यांना विचारणा केली असता, ते नागपूर येथे बैठकीसाठी गेल्याचे सांगण्यात आले. त्यांच्या भ्रमणध्वनी संपर्क होऊ शकला नाही.