शेतकऱ्यांची उपविभागीय कृषी कार्यालयावर धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:41 IST2021-09-05T04:41:25+5:302021-09-05T04:41:25+5:30
तालुक्यातील आंधळी, नवरगाव येथील शेतकरी बांधवाचे पावसाअभावी रोवणी न झाल्याने शेतकरी बांधव संकटात सापडले असून त्यांना विविध समस्या निर्माण ...

शेतकऱ्यांची उपविभागीय कृषी कार्यालयावर धडक
तालुक्यातील आंधळी, नवरगाव येथील शेतकरी बांधवाचे पावसाअभावी रोवणी न झाल्याने शेतकरी बांधव संकटात सापडले असून त्यांना विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. शासनाने त्वरित सर्व्हे करून पावसाअभावी रोवणी न झालेल्या शेतकऱ्यांना तसेच पावसाभावी शेती न पिकलेल्या शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे. उपविभागीय अधिकारी समाधान शेंडगे, कुरखेडाचे तहसीलदार सोमनाथ माळी, तालुका कृषी अधिकारी सुरभी बाविस्कर यांना भाजप युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष चांगदेव फाये यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी बांधवानी चर्चा करून निवेदन सादर केले.
यावेळी दिगांबर नाकाडे, आनंदराव कराडे, रवींद्र कराडे, धनपाल जांभुळकर, लोमेश कराडे, सुरेखा भानारकर, कुंदा भानारकर, दयाराम कराडे, निबुंना सहारे, जाबुवंत कराडे, प्रल्हाद राऊत, लीलाबाई कराडे, यादोजी भोंडे, नरेश टेर्भुणे, राजेद्र टेर्भुणे, भगवानदास टेर्भुणे, खुशाल जनबंधू, अल्का जनबंधू, रामचंद्र गहाणे, हरी नाकाडे, लक्ष्मण कराडे, निर्मला जांभुळकर, हिरामण कराडे, सुरेश जनबंधू, सत्यभामा कराडे, चितेश्वर कराडे, वसंता जनबंधु, हिरामण जांभुळकर, यशपाल कवडो, दीपक कोवळे व शेतकरी बांधव उपस्थित होते. यावेळी अधिकाऱ्यांनी या प्रश्नांसंदर्भात शासन स्तरावर पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
030921\0534img-20210903-wa0149.jpg
कूरखेडा नूकसान भरपाई चा मागणी करीता निवेदन देताना शेतकरी