शेतकरी कर्जमुक्त योजनेची प्रमाणीकरण चाचणी यशस्वी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2020 06:00 AM2020-02-15T06:00:00+5:302020-02-15T06:00:31+5:30

राज्यात पायलट स्वरूपात पाच जिल्ह्यांची निवड या कर्जमुक्तीच्या चाचणीसाठी करण्यात आली. त्यामध्ये गडचिरोली जिल्ह्याचा समावेश होता. आधार प्रमाणीकरणाची सुविधा आपले सरकार सेवा केंद्र, सामायिक सुविधा केंद्र, बँक शाखा, राशन दुकान या ठिकाणी उपलब्ध करु न देण्यात येणार आहे. गुरु वार दि.१३ फेब्रुवारी रोजी ही प्रक्रि या पार पडली.

Farmer's debt free scheme validation test successful | शेतकरी कर्जमुक्त योजनेची प्रमाणीकरण चाचणी यशस्वी

शेतकरी कर्जमुक्त योजनेची प्रमाणीकरण चाचणी यशस्वी

Next
ठळक मुद्देविविध केंद्रांवर व्यवस्था : २१ फेब्रुवारीनंतर लागणार गावनिहाय याद्या

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०१९ अंतर्गत कर्ज खात्यांची माहिती पोर्टलवर अपलोड केली जात आहे. कर्ज खात्यांचे आधार प्रमाणीकरण झाल्यानंतर सदर योजनेतील निकषानुसार शेतकऱ्यांना प्रत्यक्षात योजनेचा लाभ मिळणार आहे. गुरूवारी गडचिरोली तालुक्यातील कामेरी, मुरमाडी, खारपुडी या गावातील काही शेतकऱ्यांची आधार प्रमाणीकरण चाचणी यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली.
राज्यात पायलट स्वरूपात पाच जिल्ह्यांची निवड या कर्जमुक्तीच्या चाचणीसाठी करण्यात आली. त्यामध्ये गडचिरोली जिल्ह्याचा समावेश होता. आधार प्रमाणीकरणाची सुविधा आपले सरकार सेवा केंद्र, सामायिक सुविधा केंद्र, बँक शाखा, राशन दुकान या ठिकाणी उपलब्ध करु न देण्यात येणार आहे. गुरु वार दि.१३ फेब्रुवारी रोजी ही प्रक्रि या पार पडली.
कनेरी, खरपुंडी गावात तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्यालय शाखेत जिल्हाधिकाºयांचे प्रतिनिधी, जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) ज्ञानेश्वर खाडे, गडचिरोलीचे तहसीलदार महेंद्र गणवीर, तालुका सहायक निबंधक नितीन मस्के, गडचिरोली जि.म.स. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार, खरपुंडी गावातील आदिवासी विविध कार्यकारी विकास संस्थांचे व्यस्थापक भुसारी हे उपस्थित होते. नमूद गावात आपले सरकार सेवा केंद्र व जि.म.स. बँक शाखा केंद्रासाठी अपलोड केलेल्या माहितीमधील कर्जदार निवडक शेतकरी उपस्थित होते. उपस्थित आधार आधारित शेतकरी प्रमाणीकरणाची केवळ चाचणी पूर्ण केली असून २१ फेब्रुवारी २०२० नंतर गावनिहाय यादी प्रसिद्ध झाल्यानंतर पुनश्च प्रमाणीकरणासाठी उपस्थित राहावे लागणार आहे.

Web Title: Farmer's debt free scheme validation test successful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी