आमदारांच्या नेतृत्वात सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:38 IST2021-05-27T04:38:24+5:302021-05-27T04:38:24+5:30
गडचिराेली येथील आंदाेलनात भाजपचे जिल्हा महामंत्री गोविंद सारडा, नगरसेवक प्रमोद पिपरे, गडचिरोलीच्या नगराध्यक्ष योगिता पिपरे, उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, पंचायत ...

आमदारांच्या नेतृत्वात सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन
गडचिराेली येथील आंदाेलनात भाजपचे जिल्हा महामंत्री गोविंद सारडा, नगरसेवक प्रमोद पिपरे, गडचिरोलीच्या नगराध्यक्ष योगिता पिपरे, उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, पंचायत समितीचे उपसभापती विलास दशमुखे, भाजप तालुका अध्यक्ष रामरतन गोहणे, महामंत्री हेमंत बोरकुटे आदी उपस्थित होते. यावेळी गर्दी न करता शासनाच्या कोरोना नियमांचे पालन करून आंदोलन करण्यात आले.
चामोर्शी येथील आंदोलनात तालुकाध्यक्ष दिलीप चलाख, भाजप ओबीसी आघाडी जिल्हा महामंत्री आशिष पिपरे, भाजपचे ज्येष्ठ नेते जयराम चलाख, तालुका युवामोर्चा अध्यक्ष प्रतीक राठी यांनी सहभाग घेतला, तर धानोरा येथे साईनाथ साळवे, अंतू साळवे, नगरसेवक सुभाष धाईत, गजानन साळवे, विजय कुमरे आदी उपस्थित होते. आंदोलनादरम्यान महाविकास आघाडी सरकारच्या विराेधात घोषणा देण्यात आल्या. बॅनर व फलक दाखवून आघाडी सरकारचा निषेध करण्यात आला. आ. डॉ. देवराव होळी यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी गडचिरोली, चामोर्शी येथील उपविभागीय अधिकारी, गडचिरोली, धानोरा येथील तहसीलदार यांना दिले. शेतकऱ्यांना धानाचे चुकारे व बोनस रक्कम अदा करून न्याय द्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
बाॅक्स
महाविकास आघाडीचे सरकार हे शेतकरीविरोधी
राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे शेतकरीविरोधी असून, गडचिरोली जिल्ह्याच्या शेतकऱ्यांवर सातत्याने अन्याय करीत आहे. जिल्ह्यातील धान व मका उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतमालाची खरेदी शासनाने अजूनपर्यंत केलेली नाही. ३१ मेपर्यंत धान व मका खरेदीची मुदत असताना अजूनपर्यंत धान खरेदी झालेली नाही, तसेच मका खरेदीचे केंद्रदेखील सुरू करण्यात आले नाही. ही शेतकरी बांधवांसाठी अत्यंत अन्यायकारक बाब असून, हे सरकार शेतकऱ्यांच्या जिवावर उठले आहे, अशी टीका आ. डाॅ. देवराव हाेळी यांनी केली.