मृत शिक्षकांच्या कुटुंबीयांना ५० लाखांच्या विम्याची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:35 IST2021-05-15T04:35:07+5:302021-05-15T04:35:07+5:30

७ डिसेंबर २०२० च्या शासन निर्णयानुसार कोरोनासंबंधित जबाबदारी पार पाडत असताना शिक्षकांनाही ५० लाखांचे विमा कवच म्हणजेच सानुग्रह साहाय्य ...

Family of deceased teacher awaits Rs 50 lakh insurance | मृत शिक्षकांच्या कुटुंबीयांना ५० लाखांच्या विम्याची प्रतीक्षा

मृत शिक्षकांच्या कुटुंबीयांना ५० लाखांच्या विम्याची प्रतीक्षा

७ डिसेंबर २०२० च्या शासन निर्णयानुसार कोरोनासंबंधित जबाबदारी पार पाडत असताना शिक्षकांनाही ५० लाखांचे विमा कवच म्हणजेच सानुग्रह साहाय्य लागू करण्याची शिक्षकांची मागणी मान्य करण्यात आली होती; परंतु मृत झालेल्या शिक्षकांचे प्रस्ताव मंत्रालयापर्यंत पोहोचले असतानासुद्धा अजूनपर्यंत ते प्रस्ताव मंजूर करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे या शिक्षकांच्या कुटुंबीयांना पन्नास लाखांच्या विम्याची प्रतीक्षाच करावी लागत आहे.

या विमा कवचाबाबत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे जिल्हा अध्यक्ष संतोष सुरावार व शिक्षक आमदार नागो गाणार यांनी वारंवार सर्व संबंधित कार्यालयाकडून पुढील कार्यवाहीकरिता निवेदने देऊन प्रस्ताव शासनाकडे पाठविला. मंत्रालयातील शिक्षण संचालक यांचे सचिव यांच्याकडे पाठविण्यात आला. तरीपण अजूनपर्यंत शासन स्तरावरून पन्नास लाखांच्या विम्याची म्हणजेच सानुग्रह अनुदानाची रक्कम मृतक शिक्षकांच्या कुटुंबीयांना मिळालेली नाही. ते आजपर्यंत पन्नास लाखांच्या विम्याच्या प्रतीक्षेतच आहेत. शासनास्तरावरून ५० लाख विमा कवच मंजूर करून काेविड मृतक शिक्षकांच्या वारसांना आधार देण्याची मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे जिल्हाध्यक्ष संतोष सुरावार यांनी केली आहे.

Web Title: Family of deceased teacher awaits Rs 50 lakh insurance