गडचिरोलीत दोनशे रुपयांच्या बनावट नोटा; नागरिकांनो, व्यवहार करताना जरा जपून !
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 18:35 IST2025-07-18T18:30:11+5:302025-07-18T18:35:46+5:30
Gadchiroli : कशी ओळखाल बनावट नोट

Fake two hundred rupee notes in Gadchiroli; Citizens, be careful while transacting!
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली: वीजबिल भरणा करताना एका ग्राहकाने दिलेली २०० रुपयांची नोट बँकेने बनावट असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे दोनशे रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणणारी टोळी तर सक्रिय नाही, अशी शंका निर्माण झाली आहे. दरम्यान, एसबीआय मधील अधिकान्यांनी या नोटेवर फुली मारुन ती चलनातून बाद ठरवली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, संबंधित ग्राहकाने ४ जुलै रोजी एका बँकेतून खात्यातील पैसे विद्वॉल केले होते, त्यातील स्क्कम त्यांनी महावितरणकडे १६ जुलै रोजी थकित वीजबिलापोटी भरली महावितरणने जेव्हा ही रक्कम एसबीआयमध्ये जमा केले. मात्र, तेथील बैंक अधिकाऱ्यांना शंका आली, त्यांनी या रक्कमेतील २०० रुपयांची संशयास्पद नोट बाजूला काढून महावितरणला संपर्क कैला, त्यानंतर या नोटेवर निळ्या व हिरव्या शाईच्या पेनाने फुल्या मारुन ती चलनातून बाद ठरवली.
महावितरणने संबंधित ग्राहकास संपर्क करून ती नोट परत केली व त्या बदल्यात २०० रुपये जमा करून घेतले. दरम्यान, या प्रकारामुळे शहरात दोनशे रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणणारी टोळी सक्रिय असल्याची शंका निर्माण झाली आहे.
अशी ओळखा बनावट नोट
नोट प्रकाशात धरल्यास, महात्मा गांधींचा वॉटरमार्क स्पष्टपणे दिसला पाहिजे. नोटेमध्ये एक सुरक्षा धागा असतो, जी प्रकाशात धरल्याम दिसतो. काही नोटांमध्ये हा धागा चांदीच्या रंगाचा असती आणि त्यात विशिष्ट अंक लिहिलेला असतो. खन्या नोटेची छपाई उच्च गुणवत्तेची असते. नोटेवरील अक्षरे आणि आकडे स्पष्ट, तीक्ष्ण दिसतात.
धागा नाही, नोटही पातळ
दरम्यान, संबंधित दोनशे रुपयांच्या नोटेमध्ये हिल्या च निळ्या रंगात बदलणारा धागा नाही, तसेच नोटेचा कागद पातळ आहे. या नोटेवर महात्मा गांधी यांचा फोटोही अस्पष्ट आहे. त्यामुळे अशा प्रकारे शहरात किती बनावट नोटा आल्या, त्या चलनात आणणारे नेमके कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे.