मोहोर्ली येथे हजारो नागरिकांची नेत्र तपासणी

By Admin | Updated: November 18, 2016 01:28 IST2016-11-18T01:28:45+5:302016-11-18T01:28:45+5:30

नवयुवक मंडळ मोहोर्ली व महाराष्ट्र ग्रामीण सेवा महात्मे नेत्रपेढी रूग्णालय नागपूर तसेच जिल्हा अंधत्व नियंत्रण समिती गडचिरोली

Eye check-up of thousands of people at Mohorli | मोहोर्ली येथे हजारो नागरिकांची नेत्र तपासणी

मोहोर्ली येथे हजारो नागरिकांची नेत्र तपासणी

मोतीबिंदू शस्त्रक्रिया होणार : अतुल गण्यारपवार यांच्या हस्ते उद्घाटन
चामोर्शी : नवयुवक मंडळ मोहोर्ली व महाराष्ट्र ग्रामीण सेवा महात्मे नेत्रपेढी रूग्णालय नागपूर तसेच जिल्हा अंधत्व नियंत्रण समिती गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने मोहोर्ली येथे त्यागमूर्ती सोनिया गांधी माध्यमिक विद्यालयाच्या प्रांगणात बुधवारी नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या शिबिराचे उद्घाटन जिल्हा परिषद व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अतुल गण्यारपवार यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष गुरूदास पाटील चुधरी होते. याप्रसंगी पं.स. सदस्य नुमचंद भिवणकर, जिल्हा बँकेचे संचालक अमोल गण्यारपवार, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विनायक पाटील आभारे, घारगावचे उपसरपंच बंडू झलके, सेवा सहकारी संस्थेचे अध्यक्ष मोतीराम भगत, सेवा सहकारी संस्थेचे सदस्य मारोती पोटे, भैय्याजी मंगर, श्रीधर आभारे, उपसरपंच विजय झाडे, सुरेश परसोडे आदी उपस्थित होते. गरीब व सामान्य माणसाच्या आरोग्यासाठी झटणाऱ्या स्वयंसेवी संस्थांनी आयोजित केलेला हा आरोग्य उपक्रम अत्यंत लोकोपयोगी आहे, असे प्रतिपादन अतुल गण्यारपवार यांनी केले. यावेळी शेकडो नागरिकांची नेत्र तपासणी करून त्यांना मान्यवरांच्या हस्ते मोफत चष्मा वितरण करण्यात आले. कार्यक्रमाला यादव पाल, दिवाकर जवादे, मारोती आगरे, महादेव जवादे, सुमन चापले, भाऊजी गेडाम, देवाजी भोयर, उर्मीला मडावी, चरणदास झरकर, उमाकांत चौधरी, देविदास मांडवकर, सुरेश हजारे, दीपक येनप्रेडीवर, बंडू बोरकुटे, बापूजी देशमुख, आनंदराव बोईनवार, एकनाथ हजारे आदी उपस्थित होते. संचालन गेडाम, प्रास्ताविक हुमणे व आभार चलकलवार यांनी मानले. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Eye check-up of thousands of people at Mohorli