सेट टॉप बॉक्सवर अतिरिक्त वसुली
By Admin | Updated: January 14, 2016 02:01 IST2016-01-14T02:01:21+5:302016-01-14T02:01:21+5:30
भारत सरकारने संपूर्ण देशात केबलधारकांना सेट टॉप बॉक्सची सक्ती केली आहे. सेटटॉप बॉक्स लावण्याची ही मोहीम शहरातून गडचिरोली जिल्ह्यात पोहोचली आहे.

सेट टॉप बॉक्सवर अतिरिक्त वसुली
ग्राहकांवर भुर्दंड : १४०० च्या बॉक्सची १५०० रूपयांत विक्री
देसाईगंज : भारत सरकारने संपूर्ण देशात केबलधारकांना सेट टॉप बॉक्सची सक्ती केली आहे. सेटटॉप बॉक्स लावण्याची ही मोहीम शहरातून गडचिरोली जिल्ह्यात पोहोचली आहे. दरम्यान जिल्ह्यातील केबल नेटवर्क संचालक सेटटॉप बॉक्सवर अधिकची किंमत आकारून ग्राहकांची लूट करण्याचा धंदा सुरू केला आहे. सेट टॉप बॉक्सवरील छापील किमतीपेक्षा अधिकचा दर इन्स्टॉलेशन चॉर्जेचच्या नावावर लावत असल्याने ग्राहकांची सर्रास लूट सुरू आहे.
संपूर्ण देशातील करमणूक करावर आळा घालण्यासाठी शासनाकडून सेट टॉप बॉक्स लावण्याची सक्ती करण्यात आली. सुरुवातीला मेट्रो शहर व त्यानंतर आता लहान शहरात सेट टॉप बॉक्स लावण्याची मोहीम सुरू झाली आहे. १ जानेवारीपासून गडचिरोली जिल्ह्याच्या सर्व शहरांमध्ये सेट टॉप बॉक्स लावणे बंधनकारक केले आहे. मात्र न्यायालयाच्या आदेशान्वये सेटटॉप बॉक्स लावण्याच्या कामाला तुर्तास स्थगिती मिळाली आहे. भविष्यात सेट टॉप बॉक्स लावून घेणे आवश्यक असल्याने केबलधारक केबल संचालकांकडून सेट टॉप बॉक्स लावून घेत आहेत. गडचिरोली जिल्ह्यात दुर्गम व मागास भागात अनेक तालुक्यात नागरिकांकडे स्वत:च्या डीश उपलब्ध आहेत. त्यांच्याकडे केबल आॅपरेटरकडून सेटटॉप बॉक्स लावले जात नाही. डिश टीव्हीच्या माध्यमातून थेट प्रसारणाची सोय असल्याने जिल्ह्यात अनेक टीव्ही संच अजूनही सुरूच आहेत. मात्र शहरी भागात सेट टॉप बॉक्स लावण्यासाठी टीव्हीधारकास मनस्ताप होत आहे. (वार्ताहर)