मका विक्रीसाठी नाेंदणीची मुदत वाढवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:34 IST2021-05-01T04:34:47+5:302021-05-01T04:34:47+5:30
शासकीय आधारभूत खरेदी याेजनेंतर्गत धान व मका विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांची नाेंदणी १ ते ३० एप्रिल २०२१ या कालावधीत करायची ...

मका विक्रीसाठी नाेंदणीची मुदत वाढवा
शासकीय आधारभूत खरेदी याेजनेंतर्गत धान व मका विक्री करणाऱ्या शेतकऱ्यांची नाेंदणी १ ते ३० एप्रिल २०२१ या कालावधीत करायची हाेती. नाेंदणी झालेल्याच शेतकऱ्यांचा माल खरेदी करावा, असे वरिष्ठस्तरावरून निर्देश हाेते. काेराेनाचा प्रादुर्भाव राेखण्यासाठी शासन करीत असलेल्या उपाययाेजनांची अंमलबजावणी करण्याच्या कामात तलाठी व्यस्त आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना ७/१२ व नमुना-८ मिळू शकले नाही. अनेकांना आधारकार्ड व बँक पासबुकच्या छायांकित प्रती झेराॅक्स बंद असल्याने काढता आल्या नाही. तलाठी कार्यालय किंवा नाेंदणी केंद्रात गर्दी करता येत नाही. त्यामुळे अनेक शेतकरी नाेंदणीपासून वंचित आहेत. मका विक्रीपासून शेतकरी वंचित राहणार नाही, यासाठी ३१ मेपर्यंत नाेंदणीची मुदत वाढवावी, अशी मागणी जि.प. सदस्य तथा चामाेर्शी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अतुल गण्यारपवार यांनी राज्य शासनाकडे केली आहे.