आधारभूत धान खरेदी केंद्रावरील धान खरेदीची मुदत वाढवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:22 IST2021-03-29T04:22:36+5:302021-03-29T04:22:36+5:30
शासनाने आधारभूत केंद्रावर धान विक्रीसाठी शेतकऱ्यांवर कडक नियम लादले. सातबारा जमा करणे, टोकन घेणे, संमतीपत्र, आधार कार्ड, धान खरेदीचा ...

आधारभूत धान खरेदी केंद्रावरील धान खरेदीची मुदत वाढवा
शासनाने आधारभूत केंद्रावर धान विक्रीसाठी शेतकऱ्यांवर कडक नियम लादले. सातबारा जमा करणे, टोकन घेणे, संमतीपत्र, आधार कार्ड, धान खरेदीचा फोटोग्राफ अशा जाचक अटींचा त्यात समावेश आहे. यामुळे जिल्ह्यातील धान खरेदी प्रक्रियेला खूपच विलंब होत आहे. शासनाकडे पुरेसे गोडाऊन उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांना इकडे-तिकडे हेलपाटे मारावे लागत होते. आजही अनेक शेतकऱ्यांचे अर्धेअधिक धान घरी पडून आहेत. धान खरेदीची मुदत ३१ मार्चला संपत आहे. अशात अनेक शेतकरी धान विक्रीपासून वंचित राहण्याची शक्यता आहे. आधीच काेराेनामुळे शेतकरी हवालदिल झाला असून कसाबसा आर्थिक अडचणीतून मार्गक्रमण करीत आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेता किमान एक महिन्याकरिता आधारभूत धान खरेदी केंद्रातून धान खरेदी करण्यात यावी, अशी मागणी भारत बावनथडे यांनी केली आहे.