आरमोरी शहरात कोविड तपासणी केंद्र वाढवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 04:36 IST2021-04-21T04:36:33+5:302021-04-21T04:36:33+5:30
आरटीपीसीआर तपासणी रिपोर्ट सहा ते सात दिवसात येत असल्याकारणाने तपासणी करणाऱ्या व्यक्तीला मनात हा संभ्रम असतो की, रिपोर्ट हा ...

आरमोरी शहरात कोविड तपासणी केंद्र वाढवा
आरटीपीसीआर तपासणी रिपोर्ट सहा ते सात दिवसात येत असल्याकारणाने तपासणी करणाऱ्या व्यक्तीला मनात हा संभ्रम असतो की, रिपोर्ट हा पाॅझिटिव्ह येणार की निगेटिव्ह असा प्रश्न पडताे. त्यामुळे सुद्धा सामान्य तपासणी करणारा व्यक्ती हा व्यक्तिशः मनातून घाबरलेला असतो. त्यामुळे आरटीपीसीआर तपासणी रिपोर्ट एक किंवा दोन दिवसात देण्यात यावे, जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्या आदेशानुसार दुकानानावर काही निर्बंध लावण्यात आले आहे. त्यामध्ये फक्त किराणा दुकानेच विशिष्ट वेळेत चालू ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. परंतु सद्या स्थितीत कोरोना हा आजार मोठ्या झपाट्याने वाढत आहे. त्याकरिता दुकाने, रस्ते, व चौकाचे ठिकाण हे लवकरात लवकर सॅनिटाइज करण्यात यावे, अशीही मागणी प्रशांत मोटवाणी यांनी केली आहे. काेराेना तपासणीमध्ये लोकांना येणाऱ्या अडचणी तहसिलदारांकडे निवेदनातून मांडल्या आहेत.