पुलाअभावी विसापूरवासीयांचा वनवास कायमच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2018 01:21 AM2018-08-23T01:21:31+5:302018-08-23T01:22:43+5:30

गडचिरोलीच्या कारगिल चौकातून विसापूर, विसापूर टोली व पुढे कोटगल, इंदाळा, पारडी, सोनापूर कॉम्प्लेक्स, कलेक्टर कॉलनीकडे जाणाऱ्या मार्गावर गुड्डेवार यांच्या शेतालगत नाला आहे. सदर नाल्यावर पावसाळ्यात तीन ते चार फूट पाणी राहत असल्याने या मार्गावरील वाहतूक बºयाचदा ठप्प होत असते.

Exemption of bridge from Visapur to Vishapur | पुलाअभावी विसापूरवासीयांचा वनवास कायमच

पुलाअभावी विसापूरवासीयांचा वनवास कायमच

Next
ठळक मुद्देदरवर्षीच्या पावसाळ्यात वाढते तीव्रता : चार किमीचा फेरा मारून नागरिकांना गाठावे लागते गडचिरोली शहर

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोलीच्या कारगिल चौकातून विसापूर, विसापूर टोली व पुढे कोटगल, इंदाळा, पारडी, सोनापूर कॉम्प्लेक्स, कलेक्टर कॉलनीकडे जाणाऱ्या मार्गावर गुड्डेवार यांच्या शेतालगत नाला आहे. सदर नाल्यावर पावसाळ्यात तीन ते चार फूट पाणी राहत असल्याने या मार्गावरील वाहतूक बऱ्याचदा ठप्प होत असते. गेल्या अनेक वर्षांपासून येथे नवीन उंच व रूंद पूल उभारण्यात आला नाही. त्यामुळे विसापूरवासीयांचा वनवास अद्यापही कायम आहे.
सोयीचा व कमी अंतराचा मार्ग म्हणून अनेक नागरिक, विद्यार्थी, कर्मचारी विसापूर मार्गे कॉम्प्लेक्स व कोटगल, इंदाळा, पारडीकडे जातात. मात्र गुड्डेवार यांच्या शेतालगत काही शेतकऱ्यांनी अतिक्रमण करून नाल्याचा आकार कमी केला. गोकुलनगरलगतच्या तलावाच्या वेस्टवेअरचे पाणी सदर नाल्याद्वारे वैनगंगा नदीत जाते. शिवाय शहरातील सांडपाणी, शेतीतील व पावसाचे पाणी याच नाल्याद्वारे वैनगंगा नदीला जाऊन मिळते. मात्र सदर नाल्यावर कमी उंचीचा व अरूंद पूल आहे. शिवाय नाल्याचा आकार कमी झाल्यामुळे संततधार पावसाने सदर नाल्याच्या पुलावर तीन ते चार फूट पाणी असते. अनेक नागरिक या पाण्यातून वाहने काढतात. या ठिकाणी अनेक दुचाकीस्वारांना अपघातही घडले आहेत.
विसापूरनजीकच्या कॉम्प्लेक्स भागात लाचलुचपत प्रतिबंधक, गृहरक्षक समादेशक तसेच महावितरणचे कार्यालय आहे. महसूल विभागाच्या कर्मचाºयांचे या भागात शासकीय निवासस्थान आहे. या परिसरात जिल्हा कॉम्प्लेक्स हायस्कूल व पालिकेच्या शाळा आहेत. या सर्व कारणाने सोयीचा व कमी अंतराचा मार्ग म्हणून विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी व गडचिरोलीत येऊन काम करणारे विसापूर भागातील मजूरही याच रस्त्याने आवागमन करतात. मात्र पावसाळ्यात नाल्याच्या पुलावर पाणी चढत असल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णत: बंद होते. दोन दिवस दमदार पाऊस झाला की तीन दिवस हा मार्ग ठप्प होतो. परिणामी चार किमीचा अधिकचा फेरा मारून कॉम्प्लेक्समार्गे नागरिकांना गडचिरोलीला पोहोचावे लागते. त्यामुळे या ठिकाणी नव्याने उंच व रूंद पुलाचे काम करण्यात यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
दोन यंत्रणांच्या समन्वयाअभावी न्याय नाही
गडचिरोलीच्या कारगिल चौकाकडून विसापूर-विसापूर टोली-कोटगल-इंदाळाकडे जाणारा हा मार्ग जिल्हा परिषद बांधकाम विभागाच्या हद्दीत येतो. मात्र गडचिरोली नगर पालिकेत विसापूर भागाचा समावेश आहे. जि.प.प्रशासनाने अद्यापही सदर मार्ग गडचिरोली पालिकेकडे हस्तांतरण केला नाही. जि.प. व नगर परिषद या दोन यंत्रणेत समन्वय नसल्याने विसापूर मार्गावरील पूल व रस्त्याची समस्या ऐरणीवर आली आहे.
न.प.सभापती संजय मेश्राम व नगरसेविका रंजना गेडाम यांनी या समस्येला घेऊन जुलै महिन्यात जि.प.अध्यक्ष योगीता भांडेकर यांची भेट घेतली. निवेदनातून नवीन पूल व रस्ता दुरूस्तीची मागणी त्यांच्याकडे केली होती.

Web Title: Exemption of bridge from Visapur to Vishapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस