शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

साळवे नर्सिंग कॉलेज चातगावचा उत्कृष्ट निकाल

By admin | Updated: August 18, 2016 01:45 IST

महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल मुंबईतर्फे जीएनएम या नर्सिंग अभ्यासक्रमाचा निकाल शुक्रवार १२ आॅगस्ट रोजी जाहीर करण्यात आला.

यशाची परंपरा कायम : जीएनएम निकालात जिल्ह्यातील विद्यार्थिनी चमकल्या गडचिरोली : महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल मुंबईतर्फे जीएनएम या नर्सिंग अभ्यासक्रमाचा निकाल शुक्रवार १२ आॅगस्ट रोजी जाहीर करण्यात आला. यामध्ये चातगाव येथील डॉ. साळवे नर्सिंग कॉलेजने दरवर्षी प्रमाणे यंदाही उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखत घवघवीत यश प्राप्त केले. डॉ. साळवे नर्सिंग कॉलेजचा जीएनएम प्रथम वर्षाचा निकाल ८० टक्के, द्वितीय वर्षाचा जीएनएमचा निकाल ९३ टक्के व तृतीय वर्षाचा याच अभ्यासक्रमाचा निकाल १०० टक्के लागला आहे. डॉ. साळवे नर्सिंग कॉलेजची विद्यार्थिनी पूजा व्यास हिने प्रथम, रेशमा चिपेली हिने द्वितीय तर तेजस्विनी लाकडे हिने जीएनएम प्रथम वर्षाच्या निकालात तृतीय क्रमांक पटकाविला. जीएनएम द्वितीय वर्षाच्या अभ्यासक्रमात श्रीदेवी बारसागडे हिने प्रथम, नीलिमा अंबादे हिने द्वितीय क्रमांक पटकाविला असून या दोन्ही विद्यार्थिनी प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्ण झाल्या आहेत. जीएनएम द्वितीय वर्षामधून अभिलाषा तागडे ही विद्यार्थिनी तृतीयस्थानी आली आहे. तृतीय वर्ष जीएनएम अभ्यासक्रमात प्रियंका कावळे या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक तर वैशाली कुलसंगे हिने द्वितीय क्रमांक पटकाविला आहे. दोन्ही विद्यार्थिनी प्रावीण्य श्रेणीत उत्तीर्ण झाल्या आहेत. याच अभ्यासक्रमातून मोनू उंदीरवाडे या विद्यार्थिनीने तृतीय क्रमांक पटकाविला असून ती प्रावीण्य श्रेणीत आली आहे. उत्तीर्ण विद्यार्थिनींच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रमोद साळवे, कॉलेजच्या प्राचार्य पस्टम समक्का व इतर शिक्षकवृंदांनी कौतुक केले आहे. विद्यार्थिनींना संस्थाध्यक्ष डॉ. प्रमोद साळवे यांचे नियमित मार्गदर्शन लाभले. याशिवाय डॉ. साळवे नर्सिंग कॉलेज विविध नावीन्यपूर्ण व समाजोपयोगी उपक्रमात आघाडीवर राहिले आहे.