जंगलात मशीनद्वारे खोदकाम; वनसंपदेला पोहोचतोय धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2020 05:00 IST2020-06-14T05:00:00+5:302020-06-14T05:00:44+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : अहेरी उपविभागात ग्रामपंचायतींना उच्च दर्जाची ब्रॉडबँड कनकक्टिव्हिटी उपलब्ध करुन देण्याकरिता एका कंपनीद्वारे जंगलातून खोदकाम ...

Excavation by machine in the forest; Danger to forest resources | जंगलात मशीनद्वारे खोदकाम; वनसंपदेला पोहोचतोय धोका

जंगलात मशीनद्वारे खोदकाम; वनसंपदेला पोहोचतोय धोका

ठळक मुद्देदुर्लक्ष। अहेरी उपविभागात ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटीसाठी मशीनद्वारे काम

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : अहेरी उपविभागात ग्रामपंचायतींना उच्च दर्जाची ब्रॉडबँड कनकक्टिव्हिटी उपलब्ध करुन देण्याकरिता एका कंपनीद्वारे जंगलातून खोदकाम सुरू आहे. परंतु सदर खोदकाम जेसीबी मशीनद्वारे केले जात आहे. यात अनेक लहान वनस्पती दबून नष्ट होत आहेते तर मोठ्या वनस्पतींच्या मुळांना व खोडानांही धोका पोहोचत आहे.
अहेरी उपविभागातील भामरागड, एटापल्ली, अहेरी व सिरोंचा तालुक्यातील ग्रामपंचायतींना उच्च दर्जाची ब्रॉडबँड कनेक्टिव्हिटी उपलब्ध करुन देण्यासाठी ‘राईट आॅफ द वे’ मधून भूमिगत आॅप्टिकल फायबर केबल टाकण्याकरिता वन विभागाने मे. स्टेरलाईट टेक्नॉलॉजिस्ट लि. नागपूर या कंपनीला अटी व शर्तींच्या अधीन राहून ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे. परंतु सदर काम हे अटी व शर्तींच्या अधीन राहून केले जात नसल्याचे दिसून येत आहे. सदर कंपनीच्या वतीने जंगलातून जेसीबी मशीनद्वारे जंगलातून खोदकाम केले जात असल्याने लहान झाडे नष्ट होत आहेत. तसेच मोठ्या झाडांच्या मुळांना धोका पोहोचत आहे. सदर कंत्राटदार आपल्या मनमर्जीने हे काम करीत आहे. विशेष म्हणजे, वन क्षेत्रात काम करीत असताना वन अधिनियम १९२७ व अधिनियम १९८० मधील नियम व तरतुदींचे उल्लंघन होत आहे. अनेक झाडांची मुळासह कत्तल होत आहे. तरीसुद्धा वनविभागाचे कोणतेही अधिकारी या प्रकाराकडे लक्ष द्यायला तयार नाहीत. याप्रकरणी सखोल चौकशी करुन संबंधितांवर कारवाई करावी तसेच सुरू असलेले काम ताबडतोब थांबवावे, अशी मागणी अहेरी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष मुस्ताक हकीम यांनी प्रधान मुख्य वन संरक्षक नागपूर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यासंदर्भात त्यांनी विधानसभा अध्यक्ष, वनमंत्री, पालकमंत्री, मुख्यवन संरक्षक, उपवनसंरक्षक यांनाही निवेदन दिले.

बीबीएनएल कनेक्टिव्हिटी द्या
राज्यातील सर्व ग्रामपंचायतींना भारत ब्रॉडबँड नेटवर्क लि. मार्फत आॅप्टिकल फायबर आधारित ब्रॉडबँड कनकक्टिव्हिटी द्यावी, अशी मागणी मुस्ताक हकीम यांनी केली आहे. अहेरी उपविभागात जंगलातून सुरू असलेले खोदकाम जंगलाला हानी पोहोचविणारे आहे. त्यादृष्टीने वन विभागाने योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणीही हकीम यांनी केली आहे.

Web Title: Excavation by machine in the forest; Danger to forest resources

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :forestजंगल