पाेलीस सुरक्षेविना सुरजागड येथे लाेहखनिजाचे खाेदकाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 05:00 IST2021-05-24T05:00:00+5:302021-05-24T05:00:28+5:30
दाेन वर्षांपूर्वी या ठिकाणी लाेहखनिज उत्खननाचे काम सुरू हाेते. त्यावेळी लाेहखनिजाच्या एका ट्रकने बसला धडक दिल्याने पाच नागरिक ठार झाले हाेेते. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी माेठे आंदाेलन केले. तेव्हापासून लाेहखनिजाचे उत्खनन बंद ठेवण्यात आले हाेते. लाेहखनिजाच्या ट्रकमुळे रस्त्याची दुरवस्था झाली हाेती. त्यामुळे अपघात झाला हाेता. आताही रस्ता त्याच स्थितीत असताना पुन्हा खाेदकामाला सुरुवात करण्यात आली आहे.

पाेलीस सुरक्षेविना सुरजागड येथे लाेहखनिजाचे खाेदकाम
लाेकमत न्यूज नेटवर्क
एटापल्ली : पाेलिसांच्या काेणत्याही संरक्षणाविना तालुक्यातील सुरजागड येथे मागील काही दिवसांपासून लाेहखनिज खाेदकामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या जीवितास धाेका हाेण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
विशेष म्हणजे यापूर्वी नक्षलवाद्यांनी लाेहखनीज कंपनीच्या कर्मचाऱ्यांची हत्या केली आहे. तसेच अनेक वाहनांची जाळपाेळ केली आहे. असे असतानाही पाेलीस संरक्षणाशिवाय कंपनीने खाेदकामास सुरुवात केली आहे.
दाेन वर्षांपूर्वी या ठिकाणी लाेहखनिज उत्खननाचे काम सुरू हाेते. त्यावेळी लाेहखनिजाच्या एका ट्रकने बसला धडक दिल्याने पाच नागरिक ठार झाले हाेेते. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी माेठे आंदाेलन केले. तेव्हापासून लाेहखनिजाचे उत्खनन बंद ठेवण्यात आले हाेते. लाेहखनिजाच्या ट्रकमुळे रस्त्याची दुरवस्था झाली हाेती. त्यामुळे अपघात झाला हाेता. आताही रस्ता त्याच स्थितीत असताना पुन्हा खाेदकामाला सुरुवात करण्यात आली आहे.
अल्फा नामक कंपनी स्थानिक मजुरांकडुन अनेक जाचक अटी लिखित स्वरूपात घेऊन सेक्युरिटीच्या जागा भरत आहे. तीन कंपन्यांचे काम असल्याने अनेकजण गोंधळात आहेत. ज्या कंपनीला शासनाने लीज दिली, त्याच कंपनीने स्थानिकांना रोजगार द्यावा, अशी मागणी होत आहे. हे काम सुरू करण्यापूर्वी खराब झालेला रस्ता आधी दुरूस्त करा नंतरच लाेहखनिजाची वाहतूक करा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
परिस्थितीबद्दल अनभिज्ञ
पहाडावर प्रथमच निवासस्थानाची व्यवस्था करण्यात आली आहे. कामगार तिथेच मुक्कामी राहून काम करीत आहेत. मुख्य कंपनी लाॅयड मेटल्स आहे. आता हे काम ओडिशा राज्यातील त्रिवेणी अर्थमुव्हर्स कंपनीला देण्यात आले आहे. काम करणारे सर्वच मजूर परप्रांतीय आहेत. त्यामुळे नक्षल परिस्थितीविषयी ते अवगत नसल्याचे समजते.